हल्ली केसगळती, केसांचे कोरडे होणे, टक्कल पडणं, रुक्ष केस यांसारख्या समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. या केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अधिक मेहनत करतो. (Dry hair treatment) त्यासाठी शॅम्पू, केमिकलयुक्त साबण, कंडिशनर आणि महागड्या पार्लरमधला खर्च वाढतच राहातो. (Frizzy hair solutions) केसांवर अधिक मेहनत घेऊन देखील आपल्याला हवा तसा परिणाम मिळत नाही. (Natural oils for hair)
कोरडे आणि रुक्ष केस आपल्या सौंदर्यावर परिणाम करतात. बदल्या ऋतूनुसार केसांमधील ओलावा कमी होतो. (Home remedies for frizz) या काळात केस कोरडे, निस्तेज, रुक्ष दिसू लागतात. केसात अधिक घाम साचल्यामुळे कोंड्याच्या समस्या देखील वाढतात.( Coconut oil for hair) हिवाळ्यात केसातील नॅचरल मॉइश्चरायझर कमी झाल्यामुळे ही समस्या वारंवार आपल्याला होऊ लागते. केसांच्या या समस्यांमुळे त्यांची वाढ देखील खुंटते. (Essential oils for hair health) जर आपले केस ही सारखे कोरडे आणि रुक्ष होत असतील तर तज्ज्ञांचा हा सल्ला वापरुन पाहा.
इवलसा कडीपत्ता केसांसाठी वरदान, घनदाट-लांबसडक केस हवे असतील तर हा घ्या रामबाण उपाय
जावेद हबीब सांगतात की, केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी महागड्या उत्पादनांची आवश्यकता नाही. काही नैसर्गिक गोष्टींचा योग्य वापर करुन आपण आपल्या केसांना पुन्हा नव्यासारखे करु शकतो. त्यासाठी नारळाचे तेल अत्यंत महत्त्वाचे आहे. यात ग्लिसरीन देखील आपण घालू शकतो. ज्यामुळे केसातील कोरडेपणा कमी होईल.
1. नारळाचे तेल कसे वापरायचे?
1. कोरड्या केसांची समस्या कमी करण्यासाठी एका भांड्यात नारळाचे तेल आणि ग्लिसरीन समान प्रमाणात घेऊन मिक्स करा.
2. तयार मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर केसांना शॅम्पू लावून धुवा.
3. आठवड्यातून एकदा हे करा, यामुळे कोरड्या केसांच्या समस्यांपासून आपली सुटका होईल.
2. फायदा कसा होईल?
1. नारळाच्या तेलात मॉइश्चयरायझिंग आणि कंडिशनिंग गुणधर्म असतात. ते केसांच्या मुळांमध्ये मजबूत करण्यासह कंडिशनिंग करण्यास मदत करतात. यामुळे कोरड्या केसांची समस्या कमी होते.
2. ग्लिसरीन हे नैसर्गिक ह्युमेक्टंट आहे, जे केसांमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस हायड्रेट राहातात.