Join us  

रोज खा हा १ सुकामेवा, त्वचा होईल तजेलदार, त्वचेचे आजार कमी-तब्येतही ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 4:45 PM

Dry fruit for Glowing Skin Diet and Skincare Tips : त्वचा कायम तजेलदार आणि टवटवीत हवी असेल तर बाह्य उपचारांपेक्षा दिर्घकालीन उपचार जास्त महत्त्वाचे ठरतात.

ठळक मुद्देव्यायाम न करणे, अपुरी झोप, ताणतणाव यांचाही त्वचेवर परिणाम होत असल्याने त्वचा चांगली हवी असेल तर आहारासोबतच या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. आहार चांगला ठेवला तर तब्येत चांगली राहतेच पण सौंदर्यही टिकून राहण्यास मदत होते

आपली त्वचा कायम ग्लोइंग असावी असं प्रत्येक तरुणीला वाटतं. अभिनेत्रींप्रमाणे त्वचा तजेलदार आणि उजळ असेल तर आपणही त्यांच्याइतकेच छान दिसू शकतो असे आपल्याला वाटते. हे जरी खरे असले तरी चेहऱ्यावर येणारे फोड, पिंपल्स, त्वचेवर पडणारे डाग, खड्डे आणि सुरकुत्या यांमुळे चेहरा खराब दिसतो (Skincare Tips). अनेकदा त्वचा खूप कोरडी पडते तर कधी खूप तेलकट होते. अशावेळी नेमकं काय करायचं हे आपल्याला माहित नसतं (Skincare TIps). सतत पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट करुनही म्हणावा तसा फरक पडेल असे नाही. तसंच या ट्रीटमेंट केल्यानंतर काही दिवस चेहरा चांगला राहतो पण पुन्हा खराब होतो (Walnut Glowing Skin). 

(Image : Google)

प्रदूषण, आनुवंशिकता, ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या पद्धती, शरीराचे योग्य पद्धतीने पोषण न होणे आणि विविध सौंदर्य उत्पादने यांमुळे त्वचेच्या या तक्रारी उद्भवतात. मात्र त्वचा कायम तजेलदार आणि टवटवीत हवी असेल तर बाह्य उपचारांपेक्षा दिर्घकालीन उपचार जास्त महत्त्वाचे ठरतात. आहार हा यातील सर्वात महत्त्वाचा घटक असून आहाराच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली तर त्वचा निश्चितच चांगली राहण्यास मदत होते. इटींगवेल या संकेतस्थळावर नुकतीच त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मुनीब शाह यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी त्वचा चांगली राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीं सांगितल्या. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी...

पावसाळ्यात अजिबात खाऊ नका ४ गोष्टी, खाल्ल्या तर वाढतील चेहऱ्यावरचे पिंपल्स-येतील फोड

चांगल्या त्वचेसाठी खा हा सुकामेवा...

उत्तम त्वचेसाठी आहारात नियमितपणे काही घटकांचा समावेश असणे आवश्यक असते. त्वचा चांगली राहण्यासाठी ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड अतिशय आवश्यक असते. हा घटक आक्रोडामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात असतो. त्यामुळे सुकामेव्यातील आक्रोड आहारात आवर्जून असायला हवेत. नाश्ता आणि जेवण किंवा दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांच्या मध्ये आपल्याला काही ना काही खावेसे वाटते. अशावेळी आक्रोड. सुकामेवा किंवा फळे यांचा आहारात जरुर समावेश करायला हवा. 

अभिनेत्रींसारखी ग्लोइंग त्वचा हवी? आहारात घ्या ५ पदार्थ...बघा नितळ त्वचेची जादू...

आक्रोडाचे फायदे काय? 

आक्रोडामध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अॅसिड, पॉलिफेनॉल्स हे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या समस्यांवर आक्रोड खाण अतिशय फायदेशीर ठरते. हाडांची मजबूती, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे, उच्च रक्तदाब यांसाठीही आक्रोड फायदेशीर असते. आक्रोडामध्ये असणारे व्हिटॅमिन इ आणि प्रोटीन त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आक्रोडातील अँटीऑक्सिडंटसचाही त्वचेसाठी फायदा होतो. नुसते आक्रोड खाण्याबरोबरच लाडू, कुकीज, केक, चॉकलेट, मिल्क शेक यांच्या माध्यमातून आक्रोड खाता येऊ शकतात. 

(Image : Google)

काय टाळावे ?

अनेकदा आपण तळकट स्नॅकचे पदार्थ किंवा खूप गोड पदार्थ खातो. त्यामुळे त्वचेतील कोलेजन आणि प्रोटीनचे नुकसान होते. याचा त्वचेवर विपरित परिणाम होत असल्याने तळलेले, जास्त मसालेदार, गोड पदार्थ खाणे टाळायला हवे. व्यायाम न करणे, अपुरी झोप, ताणतणाव यांचाही त्वचेवर परिणाम होत असल्याने त्वचा चांगली हवी असेल तर आहारासोबतच या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआहार योजना