Join us  

ड्राय स्काल्प, डोक्यात प्रचंड कोंडा? काळ्या तिळाचा 'असा' वापर केलाय का? केसांच्या समस्यांवर हमखास उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2022 1:29 PM

Hair Care Tips: डोक्यात सतत होणाऱ्या काेंड्याला (dandruff) वैतागला असाल तर हा घरगुती उपाय (home remedies) करून बघा.. सोपा उपाय आहे पण अतिशय गुणकारी...(black sesame oil)

ठळक मुद्देकोंड्याच्या या समस्येचा हा बघा एक सोपा पण अतिशय परिणामकारक उपाय..

कोणताही ऋतू असो काही जणांची डोक्याची त्वचा सतत कोरडीच (dry scalp) असते. हिवाळ्यात असा त्रास होणे समजण्यासारखे आहे. पण उन्हाळा आणि पावसाळ्यातही असा कोंड्याचा (dandruff) त्रास होत असेल तर मात्र वेळीच उपाय करायला हवा. काही जणांच्या बाबतीत हा त्रास एवढा वाढलेला असतो की डोक्यात अक्षरश: कोंड्याच्या खपल्या होतात. त्यांना खूप खाज सुटते. वारंवार खाजवल्याने मग त्वचाही रक्ताळते आणि त्यातून पुन्हा नवे त्रास सुरु होतात. या सगळ्याचा परिणाम केस गळण्यावर आणि केसांच्या वाढीवर  होतो. म्हणूनच कोंड्याच्या या समस्येचा हा बघा एक सोपा पण अतिशय परिणामकारक उपाय..(benefits of black sesame oil for hair)

 

केसांसाठी काळ्या तिळाचे तेल फायदेशीर का?- आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी पांढरे तीळ ज्याप्रमाणे पोषक असतात, तसेच पौष्टिक काळे तीळ देखील असतात. पण आपण मात्र त्यांचा वापर खूपच मर्यादित करतो. त्याचप्रमाणे केसांसाठीही काळ्या तिळाचे तेल अधिक फायदेशीर ठरते.- काळ्या तिळामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ॲसिडचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे स्काल्पला मॉईश्चराईज ठेवण्यासाठी काळ्या तिळाचं तेल अधिक फायदेशीर ठरतं. - काळ्या तिळामध्ये एन्टीफंगल आणि एन्टीइन्फ्लामेटरी घटक भरपूर प्रमाणात असतात. डोक्यातला कोंडा हे एकप्रकारचे इन्फेक्शनच आहे. त्यामुळे हे इन्फेक्शन दूर करण्यासाठी तिळाचं तेल अधिक परिणामकारक ठरतं.- काळ्या तिळामध्ये असलेला थायमोक्विनोन हा घटक केसांना आणि स्काल्पला मऊ, मुलायम ठेवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे डोक्यातला ड्रायनेस कमी होऊन त्वचा मऊ होते आणि कोंड्याचा त्रास कमी होतो. 

 

काळ्या तिळाचं तेल तयार करण्याची पद्धत- केसांसाठी काळ्या तिळाच्या तेलाचा वापर करायचा असल्यास घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने तेल तयार करता येतं.- त्यासाठी अर्धा लीटर खोबरेल तेल आणि मध्यम आकाराची अर्धी वाटी भरून काळे तीळ असं प्रमाण घ्यावं. - काळे तीळ मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यावेत.- खोबरेल तेल एका भांड्यात काढून गॅसवर गरम करायला ठेवावं.- या तेलात काळ्या तिळाची पावडर टाका. जास्वंदाची ३ ते ४ फुलं चुरून टाका आणि कढीपत्त्याची ८ ते १० पानेही टाका.

- तेल चांगलं गरम होऊन उकळू द्या.- जास्वंदाची फुलं आणि कढीपत्ता यांना जेव्हा कुरकुरीतपणा येईल, तेव्हा गॅस बंद करावा.- हे तेल थंड झालं की एका बाटलीत भरून ठेवा.- आठवड्यातून दोन वेळा या तेलाने केसांना मसाज करा. त्यानंतर ३ ते ४ तासांनी केस नेहमीप्रमाणे शाम्पू करून धूवून टाका.- नियमितपणे काळ्या तिळाच्या तेलाचा अशा पद्धतीने वापर केल्यास केसातील कोंडा तर कमी होईलच पण केस अकाली पांढरे होणेही थांबेल आणि केसांची चांगली वाढ होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी