उन्हाळ्यात चेहऱ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पिंपल्स, मुरुमे, टॅनिंग सारख्या समस्या होतात.(neem aloe vera soap recipe) बदलेली जीवनशैली, प्रदूषण, अपुरी झोप आणि कामाचा वाढता ताण याच्या जितका आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तितकाच आपल्या त्वचेवर देखील होतो. (homemade soap for acne-prone skin) आपल्या प्रत्येकाला त्वचा नितळ सुंदर हवी असते. त्यासाठी महागडे पार्लर आणि क्रीमचा वापर आपण सतत चेहऱ्यावर करतो. (natural soap for sensitive skin)
चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.(how to make chemical free soap at home) परंतु, केमिकल असणाऱ्या उत्पादनाचा जास्त प्रमाणात वापर केल्यास त्वचा निस्तेज होते, पिंपल्स आणि मुरुमांचे प्रमाण वाढते. तसेच चेहऱ्यावर डाग येतात आणि खाजही सुटू लागते. (natural remedy for dry acne skin) अशावेळी आपण काही घरगुती उपायाचा वापर केला तर फायदा नक्कीच होऊ शकतो. आपण घरच्या घरी त्वचेसाठी केमिकल फ्री साबण तयार करु शकतो.(homemade herbal soap for clear skin)
२ रुपयांच्या कॉफीने हातांचे कोपरे- गुडघ्यांचा काळपटपणा होतो दूर, पाहा १० मिनिटांचा सोपा उपाय
आयुर्वेदात असे अनेक पदार्थ आहेत ज्याचा वापर फक्त औषध म्हणून होत नाही तर चवीसाठी देखील होतो. चवीला कडू असणारं कडुलिंब आरोग्यासाठी चांगलं असतं असे म्हटलं जाते. त्याची पाने संपूर्ण शरीरासाठी निरोगी मानले जातात. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचेला होणारे संक्रमण आणि दाह कमी होतो. कडुलिंब त्वचेला नैसर्गिकरित्या चमक आणते. यामध्ये कोरफडीचा गर घातल्यास त्वचेचे रक्षण करण्यास मदत करते. हा होममेड केमिकल फ्री सोप करा करायचा पाहूया.
कडुलिंबची पाने - १ वाटी
कडुलिंबच्या बिया - ४ ते ५
कोरफडीचा गर - १ वाटी
हळदी - १ चमचा
व्हिटॅमिन ई कॅप्सूल - २
ग्लिसरीन बेस सोप - १
सगळ्यात आधी कडुलिंबाची पाने साफ करुन पाण्यात भिजत ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले कडुलिंब आणि त्याच्या बिया, ताज्या कोरफडीचा गर आणि हळदी घालून पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून चमच्याने मिश्रण चांगले ढवळून घ्या. आता ग्लिसरीन बेस साबणाचे तुकडे करा. गरम पाण्यात काचेच्या बाऊलमध्ये हा साबण वितळवून घ्या. आता त्यात कडुलिंबाची तयार पेस्ट घालून मिश्रण एकजीव करा. आता मोल्डमध्ये तयार पेस्ट सेट होण्यास ठेवा. ७ ते ८ तासानंतर तयार होईल होममेड केमिकल फ्री साबण. हा साबण रोज वापरल्याने त्वचेवर मुरुमे येण्याची समस्या कमी होईल. तसेच डाग आणि टॅनिंग निघून जाईल. निस्तेज त्वचा उजळू लागेल.