जवसामध्ये नैसर्गिक तेलाचं प्रमाण चांगलं असतं. तसंच त्यामध्ये व्हिटॅमिन ई देखील असतं. त्यामुळे जवस केसांसाठी तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी एक उत्तम पौष्टिक घटक मानला जातो. हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याचा, काळवंडण्याचा त्रास जवळपास सगळ्यांनाच जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी आणि त्वचेला नैसर्गिक पद्धतीने मॉईश्चराईज करण्यासाठी जवसाचा (Use of flaxseed for dry skin) खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतो. म्हणूनच आज जवसाचे आईसक्यूब कसे तयार करायचे आणि त्याचा त्वचेवर नेमका काय परिणाम होतो, याविषयी जाणून घेऊया (home remedies for dry skin in winter).
त्वचेवरील डाग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी
(How to reduce pimples and acne)
१. त्वचेची अशी समस्या असेल तर त्यासाठी ४ टेबलस्पून जवसाची पावडर, २ कप पाणी, टी ट्री ऑईल असे साहित्य लागेल.
२. सगळ्यात आधी एका पातेल्यात पाणी घ्या. त्यात जवसाची पावडर टाका आणि हे पाणी मध्यम आचेवर उकळू द्या.
अभिनेत्री जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट, सुंदर त्वचेसाठी जुही सांगते एक सोपा घरगुती उपाय
३. जेव्हा पाण्याचा रंग पांढरट होईल आणि त्यात चिकटपणा येईल तेव्हा गॅस बंद करा. आणि पाणी गाळून घ्या.
४. या पाण्यात टी ट्री तेलाचे काही थेंब टाका आणि हे मिश्रण कोमट झाल्यावर आइस ट्रे मध्ये भरून फ्रिजरमध्ये ठेवा.
५. चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तयार झालेल्या आइस क्यूबने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून मॉईश्चराईज करा.
काेरड्या त्वचेसाठी कसे करायचे जवस आइस क्यूब
१. यासाठी ४ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल, २ टीस्पून जवस पावडर, १ कप पाणी लागणार आहे.
२. एका भांड्यात पाणी आणि जवस पावडर टाकून ते ५ मिनिटांसाठी मध्यम आचेवर उकळून घ्या. त्यानंतर त्यात ॲलोव्हेरा जेल टाका. अधिक चांगला परिणाम दिसून येण्यासाठी तुम्ही त्यात व्हिटॅमिन ई देखील टाकू शकता.
स्वयंपाक करताना तुम्हीही ३ चुका करता का? अन्नातले पौष्टिक घटकच वाया जातात.. पाहा काय चुकतंय?
३. कोमट झाल्यावर हे मिश्रण आइस ट्रेमध्ये भरून ठेवा.
४. या आइस क्यूबने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून मॉईश्चराईज करा.