Join us  

त्वचा कोरडी झाली, ४ तेलांचा करा असा वापर, निस्तेज त्वचेपासून मिळेल सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 1:01 PM

Winter Problems Best Oil for Dry Skin कोरड्या, निस्तेज त्वचेमुळे अनेकांना त्वचेवरील डलनेसचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात "या" ४ तेलांचा करा वापर, त्वचा होईल मऊ

हिवाळा सुरू झाला, गुलाबी थंडी, उबदार कपडे, गरम चहा, या सगळ्या गोष्टी सुखद अनुभव देणारे आहेत. परंतु, हिवाळ्यात मुख्य त्रास आपल्या त्वचेवर होतो. कोरडी, निस्तेज त्वचेमुळे अनेकांना रुक्ष त्वचेचा सामना करावा लागतो. या दिवसात त्वचेला हायड्रेटेट ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. आंघोळीनंतर शरीराला चांगले मॉइश्चरायझ करणे, झोपण्यापूर्वी कोरड्या त्वचेवर क्रीम लावणे हा यावरील उपचार आहे, परंतु आणखी एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. आणि तो एक मार्ग म्हणजे आंघोळीच्या पाण्यात सांगितलेल्या तेलांचे काही थेंब मिसळा. हे तेल पाण्यात मिसळल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. यासह शरीर दिवसभर सुंगधित राहते. चला त्याबद्दल जाणून घेऊया..

खोबरेल तेल

खोबरेल तेल प्रत्येक गोष्टीसाठी प्रभावी आहे. कोरडेपणाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी खोबरेल तेल हा एक चांगला आणि प्रभावी उपाय आहे. आंघोळीनंतर ते अंगावर लावल्याने फायदा होतो, पण त्याचवेळी पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने ही त्याचा फायदा होतो. खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चरायझ करते. यामध्ये असलेले फॅटी अॅसिड त्वचेच्या भेगा पडण्याची समस्या दूर करतात.

बदाम तेल

बदामाच्या तेलात अनेक पोषक तत्वे आहेत. जे त्वचेचे पोषण आणि दुरुस्तीचे काम करते. कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी याचा वापर नक्कीच करावा. या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात मिसळून आंघोळ करावी. यामुळे त्वचा मऊ तर राहतेच पण त्यामुळे त्वचेची चमकही वाढते.

लैव्हेंडर तेल

लैव्हेंडर तेलाचे अनेक फायदे आहेत. विशेषत: त्वचा आणि केसांसाठी. याशिवाय ते मूडही चांगला आणि हलका ठेवतात, त्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब टाका आणि आंघोळ करा. दिवसभर शरीराला गोड सुवास येत राहील. तसे, हे तेल वेदना किंवा सूज दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

जिरेनियम तेल

जिरेनियम तेल त्वचेच्या पीएच संतुलन राखण्यास मदत करते. या तेलाच्या मदतीने त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. या तेलाच्या मदतीने आपण चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करू शकता. आपण मॉइश्चरायझर किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करून त्वचेवर जिरेनियम तेल लावू शकता.

टॅग्स :होम रेमेडीथंडीत त्वचेची काळजीत्वचेची काळजी