Join us  

Dussehra Special beauty tips : चेहरा काळपट, थकल्यासारखा झालाय? फेशियल करायला वेळ नाहीये? फ्रेश दिसायचं तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 3:39 PM

Dussehra Special beauty tips : ऐनवेळी कुठे बाहेर जायचं असेल  किंवा चार पाहूणे घरी येणार असतील तर  काळपट, थकलेल्या आणि निस्तेज त्वचेचं करायचं तरी काय? असा प्रश्न पडतो.

सणासुदीला सुंदर दिसावं आपली त्वचा ग्लोईंग दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी प्रत्येक स्त्री स्वत:साठी थोडा का होईना वेळ काढून पार्लरला जाते. फेशियल बिशियल नाही तर निदान आयब्रो तरी करून घेते. घरची कामं, ऑफिसचं काम सगळा भार वाहत असताना स्वत:कडे पाहायला आणि स्वत:साठी पार्लरमध्ये ३ ते ४ तास द्यायला वेळ नसतो

ऐनवेळी कुठे बाहेर जायचं असेल  किंवा चार पाहूणे घरी येणार असतील तर  काळपट, थकलेल्या आणि निस्तेज त्वचेचं करायचं तरी काय? असा प्रश्न पडतो. दसरा उद्यावर येऊन ठेपलाय जर तुम्ही असूनही त्वचेला ग्लो येण्यासाठी काहीही केलं नसेल तर आम्ही आज तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही घरच्याघरी फेशियल करू शकता.  

१) सगळ्यात आधी मॉईश्चराईज करा

चेहरा भिजलेल्या टिश्यूने चांगल्याप्रकारे स्वच्छ करा. त्यानंतर तुमच्या त्वचेनुसार मॉइस्चरायजर निवडा आणि हातांनी साधारण 5 मिनिटे चेहऱ्याची मसाज करा.  याशिवाय तुम्ही क्लिंजिंग मिल्कचा ही वापर करू शकता. क्लिजिंग मिल्कनं मसाज करून चेहरा कापसानं स्वच्छ करा. 

२) वाफ घ्या

एका भांड्यात पाणी गरम करा आणि गरम पाण्याची वाफ घ्या. साधारण 10 मिनिटे हे करा. याने तुमच्या चेहरा मुलायम होईल. तुमच्याकडे स्टिमर असेल तर स्टिमरचा वापरही करू शकता.  नंतर नाकावरील ब्लॅकहेट्स काढून टाका.(ब्लॅकहेट्स काढण्यासाठी ब्लॅकहेट्स रिमुव्हरचा वापर करा) ़

फक्त २ आठवड्यात केसांचं गळणं थांबवून मिळवा लांबसडक केस; या घ्या दिवाळी स्पेशल हेअर केअर टिप्स

३) स्क्रब

कोणत्याही ब्यूटी शॉपमध्ये किंवा मेडिकलमध्ये तुम्हाला स्क्रबचे खूप पर्याय मिळतील. आपली स्किन कोरडी, तेलकट, मध्यम कशी आहे. हे विचारात घेऊन योग्य स्क्रबची निवड करावी. ब्लॅकहेट्स काढून टाकल्यानंतर त्वचेला स्क्रब लावून मसाज करा. ५ मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा कापसानं किंवा सॉफ्ट स्पंजनं पुसून घ्या. 

४) मसाज 

त्वचेला सूट होत असलेल्या कोणत्याही फेशियल किंवा, मसाज क्रिमनं मसाज करा. गालांना मसाज करताना हात गोलाकार फिरवावा यावेळी हात नेहमी खालून वरच्या दिशेनं असावा. वरून खालच्या दिशेनं मसाज केल्यास त्वचा सैल पडते. 

 'तू आता म्हातारी होत चालली आहेस'; वडिलांच्या मृत्यूनंतर प्रियांकाला शरीरातील बदलांवरून हिणवलं गेलं...

५) फेस पॅक

सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे फेसपॅक. मसाज केल्यानंतर चेहरा कापसानं स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर फेस पॅक लावा. बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फेसपॅक मिळतील त्यातील तुमचा नेहमी वापरात असलेला किंवा तुमच्या ब्युटीशियननं सजेस्ट केलेला फेसपॅक तुम्ही नेहमी वापरू शकता. या सोप्या ५ स्टेप्स नी तुमच्या त्वचेवर ग्लो येईल आणि सुंदर दिसेल.  

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्सदसरा