फेस्टिव्ह सिजनमध्ये (Dasara 2023) तुम्ही ग्लोईंग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी जर पार्लरला जायचा विचार करत असाल आणि जास्त वेळ नसेल तर तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने फेशियल करून चेहरा उजळवू शकता. यामुळे चेहरा खुलून दिसेल. (Dussehra Special Fecial at Home) स्वंयपाकघरात उपलब्ध असणारे काही पदार्थ तुमचं काम सोपं करतील. यामुळे त्वचेवर डाग पडणं, लाल चट्टे येणं या समस्या दूर होऊ शकतात. (Fecial at home)
घरीच फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी फेस क्लिजिंग महत्वाचे आहे. त्यासाठी क्लिजिंग मिल्क घेऊन चेहऱ्यावर १ मिनिटं मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पुसून घ्या. मग चेहऱ्यावर वाफ घेऊन पोर्स ओपन झाल्यानंतर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सस काढून घ्या. (Which homemade facial is best) त्यानंतर स्क्रब करून चेहरा क्लिन करा. तुम्ही घरगुती स्क्रबचाही वापर करू शकता. शेवटी चेहऱ्याला फेसपॅक लावा. १५ मिनिटांनी फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ टिश्यू पेपरने किंवा स्पंजच्या साहाय्याने क्लिन करा. (Facial at home step by step)
बेसन आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक (Homemade Besan & Milk Face pack)
एका बाऊलमध्ये एक चमचा बेसन घ्या त्यात थोडं दूध मिसळून या दोन्ही पदार्थांची पेस्ट मिसळून चेहऱ्याला लावा. हा पॅक संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला लावा. त्यांतर काहीवेळ त्वचेवर मसाज करा. १० ते १५ मिनिटं त्वचेवर तसंच लावलेले राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा फेस पॅक वापरल्यास फरक दिसून येईल.
केस गळणं वाढलं, केस पातळ झाले? रोज सकाळी १ लाडू खा; भराभर वाढतील-काळे राहतील केस
एलोवेरा आणि बेसनाचा फेसपॅक (Aloe Vera & Besan Face Pack)
एका बाऊलमध्ये १ ते २ चमचा बेसन घ्या त्यात एलोवेरा जेल मिसळा. त्यात थोडं पाणी मिसळा हे पदार्थ व्यवस्थित मिसळून मान आणि चेहऱ्यावर लावा. काहीवेळ त्वचेची मसाज केल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी त्वचेवर लावून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने मान स्वच्छ करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही हा फेस पॅक लावू शकता.
लिंबाचा रस आणि बेसन (Lemon Juice & Besan Face pack)
एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि थोडं पाणी मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा आणि १० ते १५ मिनिटांसाठी लावून राहूद्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा लावू शकता.