दिवसभर काम केल्यानंतर ऑफिसचा वर्क लोड मॅनेज करताना झोप व्यवस्थित पूर्ण होऊ शकत नाही. खासकरून सणांच्या दिवशी आपला चेहरा एकदम टवटवीत मोकळा दिसावा असं प्रत्येकालाच वाटते. पण डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांमुळे संपूर्ण चेहऱ्याचा लूकच खराब होतो. डार्क सर्कल्सच्या क्रिम्स लावूनही चेहरा सुंदर दिसत नाही. (How To Get Rid From Dark Circles Naturally)
ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. ज्याचा वापर २ ते ३ दिवसात केल्यास चांगला परिणाम दिसून येतो. डार्क सर्कल्स कमी होऊ लागतात. दसऱ्यापर्यंत तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क सर्कल्स निघून जातील आणि ही वर्तुळ लपवावी लागणार नाहीत. (Dark Circles Home Remedies)
डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येण्याची कारणं (Causes Of Dark Circles)
डार्क सर्कल्सचं सगळ्यात मोठं कारण शरीरातील कॉर्टिसोल हॉर्मोन्सची लेव्हल वाढणं हे असू शकतं. ज्यामुळे त्वचा पातळ बनते आणि काळी वर्तुळ वाढतात. पाणी कमी प्यायल्यानंही डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. याव्यतिरिक्त कोणताही आजार किंवा असंतुलित डाएटमुळेही डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं येतात.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला १ चमचा कॉफी, १ चमचा हळद, १ चमचा एलोवेरा जेल, १ चमचा मध हे साहित्य लागेल.
सगळ्यात आधी एक वाटी घ्या. त्यात कॉफी पावडर, एलोवेरा आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर या पेस्टमध्ये अर्धा चमचा मध घालून व्यवस्थित मिसळा. नंतर डोळ्यांच्या खाली २० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. मग फेसवॉशनं तोंड धुवून घ्या. नंतर मॉईश्चरायजर लावून झोपा. हा उपाय रोज रात्री केल्यामुळे २ ते ३ दिवसांत तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम दिसणं सुरू होईल.
बटाट्याचा रस
बटाट्यात ब्लिचिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे नैसर्गिक पद्धतीनं डाग आणि डोळ्यांखालची काळी वर्तुळ निघून जाण्यास मदत होते. तुम्ही वर दिलेला उपाय करून पाहू शकता. रात्री कापसाच्या मदतीनं बटाट्याचा रस आपल्या डोळ्यांच्या खाली लावा. हे दोन्ही उपाय फायदेशीर ठरतील ज्यामुळे डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत होईल.