Join us  

ना कोणतं फेसपॅक ना फेशियल; 'या' पद्धतीने ओढा तुमचे कान- चेहरा होईल एकदम चमकदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2024 4:25 PM

Ear Workout Routine For Glowing Skin: चेहऱ्यावर ग्लो आणणारा हा एक भन्नाट उपाय पाहा, बघा चेहऱ्यावर ग्लो येण्याचं आणि कान ओढण्याचं नेमकं काय कनेक्शन आहे...(best face yoga for radiant glow)

ठळक मुद्देहे व्यायाम करायला तुम्हाला ५ मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागेल. शिवाय तुम्ही घरी, ऑफिसमध्ये, गाडीमध्ये असं कुठेही बसल्याबसल्या हे व्यायाम करू शकता.

बऱ्याचजणी आपल्या रुटीनमध्ये एवढ्या जास्त अडकून गेलेल्या असतात की रोजच्यारोज चेहऱ्याची म्हणावी तशी काळजी घेणं होत नाही, स्वत:कडे म्हणावं तसं लक्ष देणं होत नाही. यामुळे मग चेहरा कमी वयातच थकल्यासारखा, प्रौढ दिसू लागतो. चेहऱ्यावरची चमक कमी होत जाते. असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर लगेच घरच्याघरी हा एक सोपा उपाय सुरू करा (Ear Workout Routine For Glowing Skin). हा उपाय करण्यासाठी ना आपण कोणतं वेगळे फेशियल करणार आहोत, ना चेहऱ्याला कोणता फेसपॅक लावणार आहोत. हा एक प्रकारचा फेसयोगा आहे (best face yoga for radiant glow). यामध्ये कानाचे वेगवेगळे व्यायाम करून चेहऱ्यावर ग्लो कसा आणायचा, याविषयी माहिती सांगण्यात आली आहे. (how to get rid of dull and dry skin)

 

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कानाचा व्यायाम

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कानाचा कसा व्यायाम करावा, याविषयीचा व्हिडिओ योग अभ्यासकांनी yog__rahulpanwar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

२ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रीन दाखवता? डॉक्टर सांगतात 'ही' चूक कराल तर तुमचं मूल कधीच..... 

यामध्ये त्यांनी कानांचे एकूण ४ व्यायाम सांगितले आहेत. हे व्यायाम करायला तुम्हाला ५ मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागेल. शिवाय तुम्ही घरी, ऑफिसमध्ये, गाडीमध्ये असं कुठेही बसल्याबसल्या हे व्यायाम करू शकता. ते व्यायाम नेमके कोणते आणि कसे करायचे ते पाहा...

 

१. पहिल्या व्यायाम प्रकारात कानाचा वरचा भाग, मधला भाग आणि खालचा भाग दोन बोटांमध्ये पकडून ओढा. असं प्रत्येकी ५ ते १० वेळा करावे.

२. दुसऱ्या व्यायाम प्रकारात पहिले बोट आणि दुसरे बोट यांच्यामध्ये कान पकडा आणि १० ते १५ सेकंदासाठी चोळा.

डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब

३. तिसऱ्या व्यायाम प्रकारात कानाचा वरचा भाग आणि खालचा भाग एकमेकांवर दाबून कान बंद करा, पुन्हा उघडा. अशी कानाची उघडझाप १० ते १५ वेळा करा. 

४. चौथ्या प्रकारात दोन्ही तळहात कानांवर ५ सेकंदासाठी दाबून ठेवा आणि नंतर लगेच काढा. असं साधारण ४ ते ५ वेळा करा. हे व्यायाम केल्याने चेहऱ्यावर छान ग्लो येईल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीयोगासने प्रकार व फायदेव्यायाम