कमी वयात केस पांढरे व्हायला लागले की आपल्याला टेन्शन तर येतेच पण एकप्रकारची लाजही वाटायला लागते. केस पांढरे झाले की विनाकारण वय झाल्यासारखे वाटते आणि मग या पांढऱ्या झालेल्या केसांचे काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. सुरुवातीला डोक्यात एखादाच केस पांढरा दिसतो. पण नंतर हळूहळू या पांढऱ्या केसांची संख्या वाढायला लागते. अशावेळी केसांना मेहेंदी लावावी की डाय करावा हे आपल्याला कळत नाही. मग बाजारात हर्बल डायच्या नावाखाली असंख्य प्रकारचे आणि कंपन्यांचे डाय उपलब्ध असतात. इतकेच नाही तर कित्येक मोठे ब्रँडही डायच्या बाजारात उतरले आहेत (Easy and Natural Home Remedy For Gray Hair).
पण एकदा केसांना डाय करायला सुरुवात केली की कायम डाय करावा लागतो. नाहीतर आपल्याला केस आधीपेक्षा जास्त पांढरे वाटायला लागतात. बाजारात मिळणाऱ्या डायमुळे काही साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. काही वेळा हे डाय वापरल्यानंतर त्वचेला खाज येणे, फोड येणे, रॅशेस येणे अशा समस्या निर्माण होतात. असे होऊ नये म्हणून घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन अगदी ५० रुपयामध्ये हेअर डाय कसा तयार करायचा ते पाहूया...
कसा तयार करायचा हेअर डाय?
१. सगळ्यात आधी लोखंडाची कढई गरम करावी आणि त्यामध्ये कलौंजीच्या बिया घालून त्या चांगल्या परतून घ्याव्यात.
२. कलौंजी चांगली भाजून झाली की त्यातच मेहेंदी, कॉफी पावडर, कडुनिंबाची पावडर, आणि आवळा पावडर घालावी.
३. यामध्ये साधारण १ ग्लास पाणी घालून हे मिश्रण १० मिनीटे चांगले शिजवावे.
४. त्यानंतर गॅस बंद करुन ही पेस्ट गार होऊ द्यावी.
केसांना लावण्याची पद्धत
१. केसांना योग्य पद्धतीने डाय व्हावा यासाठी ब्रशने किंवा हाताने हा डाय केसांच्या मूळांपासून ते टोकापर्यंत एकसारखा लावावा.
२. केस पातळ आणि लहान असतील तर साधारण अर्धा तास हा डाय केसांवर ठेवावा. पण केस दाट, जाड आणि लांब असतील तर हा डाय १ तास ठेवल्यास फायदा होतो.
३. यानंतर कोमट पाण्याने केस धुवा आणि नैसर्गिकरित्या वाळवा.
४. केस काळे होण्याबरोबरच दाट आणि मजबूत होण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो.
कसा होतो फायदा?
१. कडुनिंबाची पावडर केसांची मुळे मजबूत बनवण्यासाठी उपयुक्त असते. तसेच यातील अँटीऑक्सिडंटस केस पांढरे होण्यापासून आपली सुरक्षा करतात.
२. कलौंजीमध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडीयम आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय कलौंजीमध्ये १५ अमिनो अॅसिड असतात ज्यामुळे केस हेल्दी राहण्यास मदत होते.
३. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, प्रोटीन, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस यांबरोबरच अँटीऑक्सिडंटस चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे खराब झालेले केस रिपेयर करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.