Lokmat Sakhi >Beauty > तरुणपणीच केस पांढरे झाल्याने म्हातारे दिसता? ७ टिप्स, केस होतील काळे-दिसाल कायम तरुण

तरुणपणीच केस पांढरे झाल्याने म्हातारे दिसता? ७ टिप्स, केस होतील काळे-दिसाल कायम तरुण

Easy and simple diet tips for how to reverse hair graying : आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास केस काळे राहण्यास मदत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 04:36 PM2024-02-21T16:36:59+5:302024-02-21T18:39:45+5:30

Easy and simple diet tips for how to reverse hair graying : आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास केस काळे राहण्यास मदत होते.

Easy and simple diet tips for how to reverse hair graying : Graying hair at a young age makes you look older? 7 diet tips to get black hair, look young forever... | तरुणपणीच केस पांढरे झाल्याने म्हातारे दिसता? ७ टिप्स, केस होतील काळे-दिसाल कायम तरुण

तरुणपणीच केस पांढरे झाल्याने म्हातारे दिसता? ७ टिप्स, केस होतील काळे-दिसाल कायम तरुण

केस पांढरे होणे ही हल्ली वयस्कर लोकांना भेडसावणारी समस्या आहे असे नाही. तर हल्ली अगदी शालेय वयापासून केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. वयात आलेल्या किंवा तरुण मुला-मुलींना आपले केस कमी वयातच पांढरे झालेले असतील तर लाज वाटते. असे पांढरे केस लपवायचे कसे हा अनेकांपुढील एक महत्त्वाचा प्रश्न असतो. डाय करणे हा सगळ्यात सोपा मार्ग असला तरी एकदा हेअर डाय केला की तो वारंवार करावा लागतो. त्यामध्ये असलेल्या केमिकल्समुळे केस खराब होण्याची शक्यता असते आणि सतत डाय करण्यासाठी पैसे खर्च होतात ते वेगळेच. त्यामुळे पांढरे झालेले केस काळे पुन्हा काळे करण्यासाठी नेमकं काय करावं असा यक्षप्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण त्यासाठीच काही सोपे सहज करता येतील असे उपाय पाहणार असून तुमचेही केस पांढरे झाले असतील तर तुम्ही हे उपाय नक्की ट्राय करुन पाहा (Easy and simple diet tips for how to reverse hair graying)...

१. आहारात रताळ्याचा आवर्जून समावेश करायला हवा. यात असलेले बीटा कॅरोटीन केस काळे करण्यास उपयुक्त असते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. स्पायरोलिना ही शेवाळ्याप्रमाणे एकप्रकारची वनस्पती असते. केसांच्या आरोग्यासाठी तिचा आहारात समावेश  करणे फायदेशीर असते.  

३. हळदीमध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असल्याने त्याच्या वापराने केस काळे होण्यास मदत होते. 

४. अव्हाकॅडो या फळामध्ये व्हिटॅमिन ई असल्याने ते केसांसाठी फायदेशीर असते. 

५. केस धुताना त्यासाठी तांदूळ भिजवलेले पाणी वापरल्यास केस पांढरे होण्याची प्रक्रिया उशिरा होते. 

६. ही पण शेवाळवर्गिय वनस्पती असून आरोग्यासाठी आणि केसांसाठी या वनस्पतीच्या सप्लिमेंटसचा जरुर वापर करावा. 

७. काळे तीळ अवश्य खा, कारण यातील लोह केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.

Web Title: Easy and simple diet tips for how to reverse hair graying : Graying hair at a young age makes you look older? 7 diet tips to get black hair, look young forever...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.