Join us  

उन्हाळ्यात टॅनिंग, पिंपल्स यांमुळे चेहरा काळा पडला? १ आयुर्वेदीक उपाय, चेहरा करेल ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 9:45 AM

Easy Ayurvedic Remedy For Glowing Skin : वैद्य मिहीर खत्री सांगतात त्वचेच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी एक सोपा उपाय..

आपला चेहरा छान नितळ आणि सुंदर असावा असं प्रत्येक मुलीला वाटतं. पण कधी चेहऱ्यावर खूप डाग पडतात तर कधी सुरकुत्या पडल्याने चेहरा वयस्कर दिसतो. काही वेळा चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढतात तर कधी आणखी काही. चेहऱ्यावर फोड आणि पिंपल्स येणे ही तर अतिशय सामान्य गोष्ट आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा टॅन होण्याचे प्रमाणही जास्त असते. पोट साफ नसणे, प्रदूषण, ताण, सौंदर्यप्रसाधनांचा वापर यांसारख्या गोष्टींमुळे चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स येतात (Easy Ayurvedic Remedy For Glowing Skin). 

चेहऱ्यावरच्या समस्या दूर व्हाव्यात आणि आपण छान दिसावे यासाठी आपण सतत काही ना काही उपाय करत राहतो. यामध्ये घरगुती उपायांबरोबरच पार्लरमध्ये जाणे, महागडी सौंदर्यप्रसाधने वापरणे यांचा समावेश असतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असं नाही. या समस्यांसाठीच वैद्य मिहीर खत्री यांनी चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी एक अतिशय उपयुक्त असा आयुर्वेदीक उपाय सांगितला आहे. हा उपाय केल्यास त्वचेवरील टॅनिंग, फोड कमी होऊन त्वचा उजळण्यास मदत होईल. डॉ. खत्री यांनी आपल्या क्लिनिकमध्ये हा उपाय वापरुन पाहिला असून त्याचे उत्तम रिझल्ट आल्यानंतर हा उपाय आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

काय आहे उपाय? 

अर्जून चाळ ही एक आयुर्वेदीक वनस्पती असून त्याच्या खोडाचा वरचा भाग काढून त्याची बारीक पावडर करावी. बाजारात आयुर्वेदिक दुकानांमध्ये ही रेडीमेड पावडर सहज उपलब्ध असते.  त्यामध्ये दूध घालून ही पेस्ट चेहऱ्याला लावावी. १५ मिनीटांची ही पेस्ट चेहऱ्यावर वाळून जाते. त्यानंतर ती रगडून साध्या पाण्याने धुवून टाकावी. एक आठवडा हा उपाय केल्यास चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स कमी होण्यास मदत होते. तसेच हा उपाय १२ आठवडे म्हणजेच ३ महिने नियमित केल्यास चेहऱ्याच्या त्वचेच्या बहुतांश समस्या दूर होण्यास मदत होते. तुमची त्वचा खूप ऑयली असेल तर गुलाब पाण्यामध्ये ही पावडर एकत्र करुन लावावी. याशिवाय चेहऱ्यावर सुरकुत्या असतील किंवा कोणत्याही समस्या नसतील तरी हा उपाय फायदेशीर ठरतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीघरगुती उपाय