Join us  

Easy Beauty Hacks : हॅन्ड सॅनिटायजरचा 'असा' उपयोग पाहून व्हाल अवाक्; त्वचेचा तेलकटपणा होईल छुमंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 5:59 PM

Easy Beauty Hacks : तोंडावरचा तेलकटपणा अनेकदा चमकून दिसून येतो. त्यामुळे त्वचा काळपटही दिसते. यावर उपाय म्हणून सॅनिटायजरचा वापर करता येऊ शकतो.

ठळक मुद्देआजकाल बायका लिपस्टिक, कंगवा न्यायला विसरतील पण सॅनिटायजर आपल्या पाऊचमध्ये ठेवायला विसरणार नाहीत. 

हॅन्ड  सॅनिटायजर फक्त हात स्वच्छ करण्यासाठीच नाही तर तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे वाचाल तेव्हा तुम्हाला काहीतरी विचित्र वाटेल पण हे खरं आहे. या हंगामात चेहऱ्यावर सेबम येत असल्याने बहुतेक लोक त्रस्त असतात. तेलकट त्वचेमुळे सेबम तोंडावर दिसून येते. आजकाल बायका लिपस्टिक, कंगवा न्यायला विसरतील पण सॅनिटायजर आपल्या पाऊचमध्ये ठेवायला विसरणार नाहीत.  त्यात सॅनिटायजरचा वापर करून तुम्ही त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवू शकता.

तेलकट त्वचेपासून सुटका मिळते 

तोंडावरचा तेलकटपणा अनेकदा चमकून दिसून येतो. त्यामुळे त्वचा काळपटही दिसते. यावर उपाय म्हणून सॅनिटायजरचा वापर करता येऊ शकतो. तुम्ही कापसाच्या बोळ्यावर थोडं हॅन्ड  सॅनिटायजर लावा आणि त्याद्वारे तुमचा संपूर्ण चेहरा स्वच्छ करा. काहीवेळातच तुमच्या चेहऱ्यावरील तेल स्वच्छ होईल आणि ती चिकट चमक दिसणार नाही. 

जर तुमची त्वचा अतिसंवेदनशील असेल तर आधी पॅच टेस्ट करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. त्वचेवरील पुरळ, धुळीचे कण आणि छिद्र बंद होण्यासारखी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. कारण सॅनिटायजरमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म तुमच्या त्वचेला या सर्व समस्यांपासून वाचवतात.

चेहरा टवटवित राहतो. 

घाम, तेल आणि मृत त्वचेच्या पेशी एकत्रितपणे त्वचेवर बॅक्टेरिया वाढू देतात. जे तुम्हाला कधीही आणि कुठेही खाज सुटल्यामुळे त्रास देऊ शकते. जेव्हा जेव्हा अशी समस्या तुम्हाला त्रास देते, तेव्हा तुम्ही हँड सॅनिटायझर वापरू शकता. प्रभावित भागात थोडे हॅन्ड सॅनिटायझर लावा आणि हलकेच मसाज करा. खाज आणि जळजळीण्याच्या समस्येपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल. कुठेही तुम्हाला असे वाटले की त्वचेवर मुरुम वाढू लागला आहे, तर तुम्ही त्यावर एक प्राथमिक उपाय म्हणून हँड सॅनिटायझर लावू शकता.

फेस पावडर

चेहरा तळलेल्या पुरीसारखा तेलकट दिसू नये म्हणून तुम्ही फेस पावडर वापरता. पण जेव्हाही फेस पावडर नसते तेव्हा तुम्ही हॅन्ड  सॅनिटायझर वापरू शकता. कारण आता हॅन्ड  सॅनिटायजर तुमच्या पाऊचचा एक आवश्यक भाग बनला आहे. त्यामुळे केवळ आपले हात जंतू मुक्त ठेवण्यासाठीच नाही तर गरज पडल्यास चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्य