कोणत्याही स्त्रीला आपली त्वचा सुंदर आणि डागविरहीत राहावी असेच वाटते. सुंदर-नितळ त्वचा कोणाला नाही आवडत. पण वयानुसार त्वचेच्या निगडीत समस्या वाढत जातात. त्वचेची कितीही काळजी घेतली तरी, त्वचेवर मुरुमांचे, पिग्मेण्टेशनचे डाग, सुरकुत्या यासह इतर समस्या निर्माण होतातच. पण त्वचेची वेळीच काळजी घेतली तर, त्वचा फ्रेश आणि तरुण दिसते.
पिंपल्स, मुरूम, फोडी यांसारख्या समस्यांमुळे चेहऱ्यावरील सौंदर्य कमी होते (Beauty Tips). मुरूम पूर्णपणे गेले तरी, त्याचे डाग काही वेळेला निघत नाही (Skin Care Tips). शिवाय पिग्मेण्टेशनच्या डागांमुळेही चेहरा काळपट दिसू लागतो. जर आपण देखील या डागांमुळे त्रस्त असाल तर, लिंबाच्या सालीचा वापर करून फेसपॅक तयार करा. या फेसपॅकमुळे चेहरा तर चमकेलच, शिवाय चेहरा डागविरहीत दिसेल(Easy DIY Lemon Peel Face Packs for Glowing Skin).
मुरुमांचे डाग घालवण्यासाठी लिंबाच्या सालीचा फेसपॅक
साहित्य
लिंबाची साल
टॉमेटो
कडूलिंबाच्या पानांची पावडर
गव्हाचं पीठ
दही
फेसपॅक तयार करण्याची पद्धत
केसांना जास्त तेल लावले की गळतात? नक्की खरं काय? केसांना कितीवेळ आणि कधी तेल लावावे?
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात २ लिंबाच्या साली, अर्धा चिरलेला टॉमेटो, एक चमचा कडूलिंबाच्या पानांची पावडर, एक टेबलस्पून गव्हाचं पीठ आणि एक टेबलस्पून दही घालून पेस्ट तयार करा. अशा पद्धतीने अॅक्ने रिमुव्हल फेसपॅक वापरण्यासाठी रेडी.
चेहऱ्यावर अॅक्ने रिमुव्हल फेसपॅक लावण्याची योग्य पद्धत
चेहरा प्रथम स्वच्छ धुवून घ्या. नंतर चमच्याने किंवा हलक्या हाताने पेस्ट लावा. २० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावर निर्माण झालेले मुरुमांचे डाग, ब्लॅकहेड्स, डार्क सर्कल आणि पिग्मेण्टेशनचे डाग दूर होतील.
चेहऱ्यावर लिंबाचा रस लावण्याचे फायदे
लिंबाच्या रसापासून ते लिंबाच्या सालांपर्यंत, लिंबू त्वचेसाठी फायदेशीर ठरते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात आढळते, जे अँटी एजिंग म्हणून काम करते. यासह चेहऱ्याच्या छिद्रांमधील साचलेली घाण काढण्यास मदत करते.
कडूलिंबाची पावडर
कडूलिंबाची पानं आरोग्य आणि चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. जर आपल्याला नितळ त्वचा हवी असेल तर, फेसपॅकमध्ये चमचाभर कडूलिंबाची पावडर मिक्स करा.
दुधात ५ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, नकोसे केस गायब - चेहऱ्यावर येईल नवे तेज..
दही
दही फक्त आरोग्यासाठी फायदेशीर नसून केस आणि त्वचेसाठीही वरदान ठरते. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. यासह चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. जर आपल्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवायचं असेल तर, चेहऱ्यावर दही न चुकता लावा.