Join us  

डबल चीन असेल तर न चुकता करा ४ व्यायाम, काही दिवसांत चेहऱ्याचा शेप दिसेल परफेक्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2022 10:40 AM

Easy Facial Exercises for Double Chin by Sonali Seygall : हे व्यायाम नियमित केल्यास डबल चीन कमी होण्यास निश्चितच फायदा होतो.

ठळक मुद्देचेहऱ्याचे रक्तभिसरण सुरळीत झाले तर चेहरा फ्रेश दिसायलाही याची चांगली मदत होईल. संपूर्ण चेहऱ्याचा व्यायाम तर होईलच पण दिवसभराच्या ताणामुळे आखडलेले स्नायू मोकळे होण्यासही याची चांगली मदत होईल. 

कधी सेल्फी काढताना तर कधी प्रत्यक्षात आपण फार जाड नसू तरी जाड दिसतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डबल चीन. हनुवटीखाली वाढलेली चरबी आपल्या चेहऱ्याचा शेप बिघडवते आणि आपण विनाकारण वय वाढल्यासारखे किंवा बेढब दिसतो. आपला चेहरा छान शेपमध्ये असेल तर आपल्या सौंदर्यात निश्चितच भर पडते. आपली जॉ लाइन परफेक्ट दिसल्याने आपल्या लूक्समध्ये नक्कीच फरक पडतो. पण आता ही वाढलेली डबल चीन घालवायची कशी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी आज आपण काही सोपे व्यायामप्रकार पाहणार आहोत. हे व्यायाम नियमित केल्यास डबल चीन कमी होण्यास निश्चितच फायदा होतो. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सेहगल हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून या व्यायामप्रकारांची माहिती दिली आहे. पाहूयात हे व्यायामप्रकार कोणते (Easy Facial Exercises for Double Chin by Sonali Seygall)...

(Image : Google)

१. आपण ज्याप्रमाणे मानेचे व्यायामप्रकार करतो त्याचप्रमाणे मान पुढे आणि मागे करायची. हे करताना मानेला हिसका बसणार नाही याची मात्र काळजी घ्यायला हवी. यामुळे मानेच्या स्नायूंना चांगला ताण पडतो.

२. पाठीचा कणा ताठ ठेवून खुर्चीत बसा. डावा हात डोक्यावरुन उजव्या गालावर ठेवून मान डावीकडे दाबण्याचा प्रयत्न करा. तसेच उजव्या बाजुलाही करा. हे करतानाही जास्त ताण पडणार नाही याची काळजी घ्या. 

३. तोंडात हवा भरुन घ्या. ही हवा एकदा उजव्या गालात भरा एकदा डाव्या गालात भरा. यामुळे गालांच्या स्नायूंचा आणि एकूण जबड्याचा चांगला व्यायाम होईल. कमीत कमी ३० सेकंद हवा तोंडात ठेवा. दिवसातून हा व्यायाम आपण कुठेही करु शकत असल्याने ४ ते ५ वेळा तर अवश्य करा. 

४. जीभ बाहेर काढा आणि संपूर्ण ओठांवरुन एकसारखी फिरवा. हा काहीसा हास्यास्पद व्यायामप्रकार वाटू शकेल. पण त्याचा डबल चीन कमी होण्यास किंवा चेहरा शेपमध्ये येण्यास चांगला उपयोग होतो. 

५. मान वर करा आणि तोंड उघड-बंद करा. पुन्हा मान नेहमीसारखी करा. पुन्हा वर करुन तोंडाचा आ वासून बंद करा. असे किमान ५ ते ७ वेळा जरुर करा. यामुळे जबड्याचा चांगला व्यायाम होईल. 

६. डोळे मिचकवल्यासारखे करा आणि पाऊट करा. एकामागे एक असे सलग करत राहा. यामुळे संपूर्ण चेहऱ्याचा व्यायाम तर होईलच पण दिवसभराच्या ताणामुळे आखडलेले स्नायू मोकळे होण्यासही याची चांगली मदत होईल. 

७. सगळ्यात शेवटी हाताने मानेला आणि चेहऱ्याच्या सगळ्या भागाला छानसा मसाज करा. यामुळे तुम्हाला नकळत खूप फ्रेश वाटेल. चेहऱ्याचे रक्तभिसरण सुरळीत झाले तर चेहरा फ्रेश दिसायलाही याची चांगली मदत होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीफिटनेस टिप्सव्यायाम