केस लांबसडक असले की त्याच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल करता येतात आणि मग सगळ्यांमध्ये आपण उठून दिसतो. पण अनेकदा काहीही केलं तरी केस वाढतच नाहीत आणि मग काय करावं आपल्याला समजत नाही. इतरांचे मोठे केस पाहिले की आपल्याला आणखीनच त्रास होतो. काहीवेळा केस वाढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करुन पाहतो पण त्याचा उपयोग होतोच असे नाही (Easy home made Hair Growth Spray for thicker & shiner hair).
तर पार्लरच्या ट्रिटमेंटसही खूप महाग असतात त्यामुळे त्यासाठीही बरेच पैसे खर्च होतात. वाढते प्रदूषण, केमिकल्सचा अतिवापर, आहारातून न मिळणारे पोषण यामुळे केसगळती होते आणि ते काही केल्या वाढत नाहीत. अशावेळी एक सोपा घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. हा उपाय नैसर्गिक असल्याने केसांवर त्याचा कोणताही विपरीत परीणाम होत नाही. पाहूयात हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा...
केस वाढीसाठी उपाय काय?
१. एका पातेल्यात साधारण १ चमचे मेथ्या, १ चमचा कलौंजी, अर्धा चमचा जवस घ्यायचे.
२. यात १ चमचा कोरफडीची पानं आणि १ बारीक चिरलेला कांदा घ्यायचा.
३. आत १ चमचा तांदूळ आणि साधारण १.५ ग्लास पाणी घालायचे.
४. हे सगळे मिश्रण गॅसवर साधारण ५ मिनीटे चांगले उकळायचे.
५. गार झाल्यावर हे मिश्रण गाळून एका स्प्रे बाटलीमध्ये भरायचे.
६. स्प्रे बाटलीने हा स्प्रे केसांच्या मुळांशी सगळीकडे नीट मारायचा.
७. साधारण २० मिनीटे हा स्प्रे केसांवर तसाच ठेवून नंतर केस नेहमीप्रमाणे धुवून टाकायचे.
८. महिनाभर नियमितपणे हा उपाय केल्यास केस वाढण्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग झालेला दिसेल.