Join us  

केसांतला कोंडा कमीच होत नाही? आजीबाई सांगतात ५ पारंपरिक उपाय, कोंडा होईल गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2024 10:50 AM

Easy home remedies for Dandruff problem : पारंपरिक उपायांनी कोंडा नक्कीच कमी होऊ शकतो

कोंडा ही अनेक महिलांसाठी आणि पुरुषांसाठीही एक महत्त्वाची समस्या असते. केसांची मुळे कोरडी पडल्याने किंवा प्रमाणापेक्षा जास्त तेलकट झाल्यानेही केसांत कोंडा होतो. कोंडा होण्यामागे प्रदूषण, आपण केसांसाठी वापरत असलेली उत्पादने, केसांना अन्नपदार्थांतून मिळणारे पोषण अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. कोंडा एकदा झाला की तो काही केल्या कमी होत नाही. मग हा कोंडा केसांत वरती दिसतो आणि अनेकदा कपड्यांवरही पडतो. असा कोंडा दिसला की समोरच्यांनाही खराब वाटते आणि आपल्यालाही लाजल्यासारखे होते. मग आपण कोंडा जाण्यासाठी पार्लरचे महागडे उपचार करतो. पण त्यापेक्षा पारंपरिक उपायांनी कोंडा नक्कीच कमी होऊ शकतो. आपली आजी चॅनेलच्या सुमन धामणे युट्यूबवरुन पारंपरीक रेसिपी तर सांगतातच. पण आता त्यांनी कोंडा कमी होण्यासाठी काही उपायही सांगितले आहेत. हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे पाहूया (Easy home made remedies for Dandruff problem)...

१. दही

केसांच्या मुळांशी दही लावायचे आणि अर्धा ते पाऊण तास ते तसेच ठेवायचे. त्यानंतर केस नेहमीप्रमाणे स्वच्छ धुवून टाकायचे. दह्यामुळे कोंडा निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)

२. मेथ्या आणि लिंबू

मेथ्यांचे दाणे रात्रभर भिजत घालायचे आणि सकाळी ते मिक्सरच्या भांड्यात चांगले वाटून घ्यायचे. घट्टसर पेस्ट तयार झाली की त्यात लिंबाचा रस पिळायचा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावायची आणि अर्धा तास ठेवून केस स्वच्छ धुवून टाकायचे. 

३. कडुलिंबाची पाने

कडुलिंबाची पाने कुठेही अगदी सहज उपलब्ध होऊ शकतात. ही पाने मिक्सरमध्ये घालून त्यात थोडे पाणी घालावे. बारीक वाटून घेतल्यावर केसांच्या मुळांना ही पाल्याची पेस्ट लावायची आणि १५ ते २० मिनीटे ठेवायची. यातील गुणधर्मांमुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. 

४. कापूर आणि तेल

एका वाटीत खोबरेल तेल घ्यायचे आणि त्यात साधारण चमचाभर कापूर पावडर घालायची. बाजारातही ही पावडर मिळते नाहीतर कापूर कुटून घरात आपण ही पावडर तयार करु शकतो. ज्यांची डोक्याची त्वचा जास्त कोरडी आहे त्यांनी हा उपाय करायचा. रोज रात्री या तेलाने मालिश केल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.

५. कोरफडीचा गर

कोरफड ही आरोग्य आणि सौंदर्यासाठी अतिशय उपयुक्त असते. कोरफडीचा गर केसांना लावल्यास कोंड्याचे प्रमाण कमी होण्यास चांगली मदत होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी