Lokmat Sakhi >Beauty > आयब्रो फार बारीक- विरळ झाल्या? काळ्याभोर-दाट भूवयांसाठी ४ सोपे उपाय, डोळे दिसतील सुंदर

आयब्रो फार बारीक- विरळ झाल्या? काळ्याभोर-दाट भूवयांसाठी ४ सोपे उपाय, डोळे दिसतील सुंदर

Easy Home Remedies to get Dark and Thick Eyebrows : आयब्रोज आकर्षक दिसाव्यात यासाठी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2023 03:33 PM2023-08-08T15:33:15+5:302023-08-08T17:46:15+5:30

Easy Home Remedies to get Dark and Thick Eyebrows : आयब्रोज आकर्षक दिसाव्यात यासाठी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय...

Easy Home Remedies to get Dark and Thick Eyebrows : Eyebrows thin? 4 Easy Remedies for Dark, Thick Eyebrows; Beauty will enhance… | आयब्रो फार बारीक- विरळ झाल्या? काळ्याभोर-दाट भूवयांसाठी ४ सोपे उपाय, डोळे दिसतील सुंदर

आयब्रो फार बारीक- विरळ झाल्या? काळ्याभोर-दाट भूवयांसाठी ४ सोपे उपाय, डोळे दिसतील सुंदर

सौंदर्य हे अनेकदा आपल्या चेहऱ्यावर अवलंबून असते. चेहरा किती सुबक आणि नेटका आहे त्यावर आपण किती सुंदर दिसतो हे ठरते. पण यातील बहुतांश गोष्टी या नैसर्गिकरित्या मिळालेल्या असल्याने त्यामध्ये आपण फारसे बदल करु शकत नाही. मुली नाकी-डोळी चांगल्या असल्या तर त्या दिसायला चांगल्या आहेत असे म्हटले जाते. यामध्ये साधारणपणे नाकाची ठेवण आणि डोळ्यांचा बोलकेपणा गृहित धरला जातो. डोळ्यांच्या सौंदर्यामध्ये डोळ्यांच्या पापण्या, डोळ्यांचा मोठेपणा, आयब्रोज यांसारख्या बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. 

आयब्रोज मूळात जाड आणि चांगल्या असतील तर ठिक. पण त्या विरळ आणि बारीक असतील तर मात्र डोळे उठून दिसत नाहीत. अशावेळी बऱ्याच जणी कृत्रीम आयब्रोज लावणे, आयब्रो पेन्सिल वापरुन त्याचा आकार वाढवणे किंवा पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटस करुन घेणे असे बरेच प्रकार केले जातात. पण यामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता असल्याने आयब्रोज चांगल्या दिसाव्यात आणि राहाव्यात यासाठी आज आपण काही सोपे उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्याने आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात नक्कीच भर पडण्यास मदत होईल. हे उपाय नैसर्गिक असल्याने त्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही.

१. एरंडेल तेल

केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल अतिशय उपयुक्त असते. यामध्ये एकप्रकारचे अॅसिड असते ज्यात अँटीइन्फ्लमेटरी आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. याबरोबरच एरंडेल तेलात व्हिटॅमिन ई, ओमेगा ६ फॅटी अॅसिडसारखे बरेच पोषक घटक असतात, ज्यामुळे केसांची वाढ होते. एरंडेल तेल कापसाने किंवा बोटांनी नियमितपणे आयब्रोजवर लावले तर याठिकाणी दाट केस येण्यास मदत होते.

२. कांद्याचा रस

कांद्यामध्ये सल्फर असते ज्यामुळे केस लांब आणि दाट होण्यास मदत होते. नियमितपणे आयब्रोजवर कांद्याचा रस लावल्यास आयब्रोज वाढण्यास मदत होते. २ ते ३ आठवड्यामध्ये याचा चांगला रिझल्ट दिसतो. 

३. ऑलिव्ह ऑईल

या तेलामध्ये फेनोलिक कंपाऊंड चांगल्या प्रमाणात असते, ज्यामुळे केस लांब आणि दाट होतात. त्यामुळे आयब्रोज वाढण्यासाठी नियमितपणे ऑलिव्ह ऑईल लावावे.

(Image : Google)
(Image : Google)

४. कच्चे दूध 

कच्चे दूध लावण्याचे अनेक फायदे होतात. यामुळे केवळ आयब्रोजचे केस वाढतात असे नाही तर हे केस शायनी होण्यास मदत होते. त्यामुळे नकळत आयब्रोज आकर्षक दिसतात. 

Web Title: Easy Home Remedies to get Dark and Thick Eyebrows : Eyebrows thin? 4 Easy Remedies for Dark, Thick Eyebrows; Beauty will enhance…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.