आपला चेहरा छान नितळ आणि सुंदर असावा असं प्रत्येक मुलीला वाटतं. पण कधी चेहऱ्यावर खूप डाग पडतात तर कधी सुरकुत्या पडल्याने चेहरा वयस्कर दिसतो. काही वेळा चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढतात तर कधी आणखी काही. चेहऱ्यावर फोड आणि पिंपल्स येणे ही तर अतिशय सामान्य गोष्ट आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा टॅन होण्याचे प्रमाणही जास्त असते. पोट साफ नसणे, प्रदूषण, ताण, सौंदर्यप्रसाधनांचा वापर यांसारख्या गोष्टींमुळे चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स येतात. यासाठी नेमके काय उपाय करायचे हे आपल्याला माहित नसते. अशावेळी आपण काही घरगुती उपाय करतो किंवा सौंदर्य उत्पादने वापरुन हे फोड आणि पिंपल्स झाकले जाण्यासाठी प्रयत्न करतो. पण यामुळे फोड तात्पुरते लपले जातात (Easy Home Remedy for Acne and Pimples Problem Beauty Tips).
हे फोड आणि पिंपल्स तसेच टॅनिंग पूर्णपणे निघून जावे यासाठी ठोस उपाय करायला हवेत. घरच्या घरी करता येईल असा एक सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. नैसर्गिक घटकांचा वापर करत असल्याने यामुळे कोणताही साईड इफेक्ट होण्याचीही शक्यता नाही. तर फळांमधील पपईचा यासाठी चांगला उपयोग करता येऊ शकतो. पपईमध्ये ए, सी, डी, बी १२ आणि इतरही काही खनिजं असतात. एरवी आपण पपई खाल्ल्यावर त्याची सालं फेकून देतो. पण याच सालांचा वापर चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. या सालांमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरचे फोड आणि पिंपल्स, पुटकुळ्या जाण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पाहूया ही ट्रीक काय आहे आणि ती कशी फॉलो करायची.
१. पपई खाण्यासाठी आपण त्याचा मधला गर काढून घेतो आणि सालं फेकून देतो.
२. मात्र गर काढून झाल्यानंतर सालं फेकून न देता त्याचे लहान लहान तुकडे करुन घ्यायचे.
३. या सालांवर तांदळाचे पीठ घ्यायचे.
४. मग ही साले ज्याठिकाणी फोड किंवा पिंपल्स, सन टॅन आहे त्याठिकाणी चांगली घासायची.
५. काही वेळ हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवायचे
६. मग गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकायचा.