Join us  

केसातील कोंडा कमी होण्यासाठी जावेद हबीब सांगतात १ सोपा उपाय, केसातला कोंडा-खाज होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 11:25 AM

Easy Home remedy for Dandruff Issue by hair stylist jawed habib in winter hair care tips : केवळ थंडीतच नाही तर एरवीही प्रदूषण, प्रमाणाबाहेर केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर यांमुळेही केसांतला कोंडा वाढतो.

थंडीच्या दिवसांत शरीराच्या आत आणि बाहेर कोरडेपणा निर्माण होतो. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आपण त्वचेला तेल लावणे, मॉईश्चरायजर, कोल्ड क्रिम असे काही ना काही लावतो. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. पण शरीराच्या त्वचेबरोबरच आपली डोक्याची त्वचाही कोरडी पडते. या त्वचेच्या कधी खपल्या निघतात तर कधी कोरडेपणामुळे त्यात प्रमाणाबाहेर कोंडा होतो. हा कोंडा एकदा झाला की तो लवकर कमी व्हायचे नाव घेत नाही. अशावेळी आपल्याला नेमके काय करावे ते कळत नाही (Easy Home remedy for Dandruff Issue by hair stylist jawed habib in winter hair care tips) . 

(Image : Google)

केस विंचरताना हा कोंडा कपड्यांवर पडतो. इतकेच नाही तर केसांवरही बरेचदा हा कोंडा दिसून येतो. केवळ थंडीतच नाही तर एरवीही प्रदूषण, प्रमाणाबाहेर केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर यांमुळेही केसांतला कोंडा वाढतो. प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांनी हा कोंडा कमी होण्यासाठी घरच्या घरी करता येईल असा सोपा उपाय सांगितला आहे. जावेद हबीब आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कायम काही ना काही उपयुक्त टिप्स देत असतात, त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही जास्त असल्याचे दिसते. 

कोंडा कमी होण्यासाठी उपाय काय? 

अर्धा कप दही घेऊन त्यामध्ये व्हाईट व्हिनेगर घालायचे. हे मिश्रण ब्रशने चांगले एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करायची. केसांच्या मुळांशी डोक्यात सगळीकडे ही पेस्ट एकसारखी लावायची. साधारण अर्धा तास हे तसेच ठेवून नंतर नेहमीच्या शाम्पूने केस धुवायचे. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास कोंडा निघून जाण्यास मदत होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी