Join us  

उन्हाळ्यात घामाने मान खूप काळी झाली? मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी १ सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 11:40 AM

Easy Home Remedy For Dark Black Neck : घरच्या घरी काही सोप्या उपायांनी मानेचा काळेपणा दूर करता येऊ शकतो.

आपण बरेचदा चेहरा, हात यांसारख्या दर्शनी भागांकडे लक्ष देतो. हे भाग स्वच्छ दिसावेत यासाठी प्रयत्न करतो आणि प्रसंगी पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंटही घेतो. पण मानेकडे मात्र आपले म्हणावे तितके लक्ष जात नाही. सतत घाम आल्याने, लठ्ठपणामुळे किंवा आणखी काही ना काही कारणाने मानेभोवतीची त्वचा काळी पडते. एकदा ही त्वचा काळी पडायला सुरुवात झाली की ती पुन्हा इतर त्वचेसारखी होणे एक आव्हान असते. याशिवाय उन्हाळ्यात गरम होत असल्याने आपण डीपनेक, स्लिव्ह्जलेस कपडे वापरतो. अशावेळी आपली मान खूप काळी असेल तर ते वाईट दिसते (Easy Home Remedy For Dark Black Neck). 

अनेकदा मान काळी पडण्यामागे काही वैद्यकीय कारणेही असू शकतात. ही कारणे शोधणे आणि त्यानुसार योग्य ते उपचार करणे गरजेचे असते. लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेजिस्टंटमुळे त्वचेवर मेलेनिन जमा होते. यामुळे, गळ्यासह अंडरआर्म्स आणि मांड्या सारखे इतर भाग देखील काळपट होतात. वजन कमी करणं आणि इंसुलिन रेजिस्टेंसचा उपचार केल्यामुळे मानेवरचा काळपटपणा कमी होऊ शकतो. मात्र घरच्या घरी काही सोप्या उपायांनी मानेचा काळेपणा दूर करता येऊ शकतो. पाहूयात मानेचा काळेपणा दूर करण्याचा असाच एक घरगुती सोपा उपाय. 

(Image : Google)

१. कोरफडीचे पान घ्यायचे, ते मध्यभागी कापायचे म्हणजे त्याचा गर दिसतो.

२. यावर अर्धा ते १ चमचा तांदळाचे पीठ घालायचे. 

३. त्यावर थोडी हळद, साखर आणि बेकींग सोडा घालायचे. 

४. कोमट पाण्यातून काढलेला टॉवेल ५ मिनीटां मानेवर ठेवायचा.

५. हे सगळे घातलेले कोरफडीचे पान काळ्या झालेल्या मानेवर १० ते १५ मिनीटे चोळायचे.

६. त्यानंतर साध्या पाण्याने मान साफ करायची, काळेपणा निघून जाण्यास याचा चांगला फायदा होतो.

७. पाण्याने मान स्वच्छ केल्यावर त्याठिकाणी मॉईश्चरायजर लावायचे, हा संपूर्ण उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी