Join us  

डोळ्याखालचे काळे डाग आणि डार्क सर्कल घालवण्यासाठी भाग्यश्री सांगते एक सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 10:05 AM

Easy Home Remedy for Dark Circle By Actress Bhagyashri : घरच्या घरी काही सोपे उपाय केले तर आपल्या सौंदर्याच्या बऱ्याच समस्या दूर होतात.

ठळक मुद्देमहागड्या उपचारांपेक्षा घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय केव्हाही चांगले थकवा दूर करणारा आणि त्वचा फ्रेश ठेवणारा सोपा उपाय...

आपला चेहरा सतेज आणि ताजातवाना असावा असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं. मात्र काही कारणांनी चेहऱ्यावर फोड येतात, कधी सुरकुत्या पडतात तर कधी डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात आणि डाग पडतात. एकदा ही समस्या निर्माण झाली की काय करावे हे अनेकदा आपल्याला समजत नाही. मग आपण कधी पार्लरमध्ये जाऊन काही उपाय करतो किंवा बाजारात मिळणारी महागडी उत्पादने आणून त्यांचा वापर करतो. पण त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केले तर आपल्या सौंदर्याच्या बऱ्याच समस्या दूर होतात. कधी झोप झाली नाही म्हणून, कधी ताणांमुळे, अनुवंशिकतेमुळे किंवा पुरेसे पोषण न मिळाल्याने डार्क सर्कल यायला लागतात (Easy Home Remedy for Dark Circle By Actress Bhagyashri). 

(Image : Google)

प्रसिद्ध अभिनेत्री ही डार्क घालवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगतात. भाग्यश्री सोशल मीडियावर बऱ्याच अॅक्टीव्ह असून त्या आपल्या चाहत्यांना कायम डाएट, फिटनेस, ब्यूटी यांच्याशी निगडीत काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे बरेच फॉलोअर्स असून दर मंगळवारी त्या एक महत्त्वाची टीप शेअर करतात. आपल्याला अनेकदा प्रवास किंवा कामाच्या थकव्यामुळेही डोळ्यांखाली काळे डाग येतात. अशावेळी भाग्यश्री यांनी सांगितलेला हा उपाय फायदेशीर ठरतो. आपण जेव्हा प्रवासाने खूप दमतो, खूप वेळ शूट केल्यानंतर थकवा येतो तेव्हा तो घालवण्यासाठी आपण हा उपाय करत असल्याचे भाग्यश्री म्हणतात. एका दिवसांत त्यांच्या या पोस्टला ३८ हजारांहून अधिक लाईक्स आले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

कसा तयार करायचा पॅक 

१. कोरफडीचा गर एका बाऊलमध्ये घ्यावा.

२. त्यामध्ये केळ्याचा सालीचा आतला पांढरा भाग भाग घालून ते चांगले एकत्र करावे. 

३. हे मिश्रण डोळ्यांच्या खाली लावावे. त्यामुळे डोळ्यांच्या खालच्या कोरड्या झालेल्या भागाला मॉईश्चर मिळण्यास मदत होते. 

४. ही पेस्ट २० मिनीटे डोळ्यांखाली तशीच ठेवावी आणि त्यानंतर चेहरा गार पाण्याने धुवून टाकावा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सभाग्यश्रीत्वचेची काळजीडोळ्यांखाली काळी वर्तुळं