Lokmat Sakhi >Beauty > केस भरभर वाढतच नाहीत? १ सोपा घरगुती उपाय, केस वाढतील लांबसडक-होतील दाट

केस भरभर वाढतच नाहीत? १ सोपा घरगुती उपाय, केस वाढतील लांबसडक-होतील दाट

Easy Home Remedy for Hair Growth : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा उपाय करता येत असल्याने त्यासाठी फार खर्चही येत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2022 11:30 AM2022-12-18T11:30:07+5:302022-12-18T11:33:40+5:30

Easy Home Remedy for Hair Growth : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा उपाय करता येत असल्याने त्यासाठी फार खर्चही येत नाही.

Easy Home Remedy for Hair Growth : Hair not growing? 1 simple home remedy, hair will grow longer and thicker | केस भरभर वाढतच नाहीत? १ सोपा घरगुती उपाय, केस वाढतील लांबसडक-होतील दाट

केस भरभर वाढतच नाहीत? १ सोपा घरगुती उपाय, केस वाढतील लांबसडक-होतील दाट

Highlightsपार्लरमधल्या महागड्या उपचारांपेक्षा घरच्या घरी सोपे उपाय केले तर...घरात सहज उपलब्ध असणारे पदार्थ केसांच्या वाढीसाठी ठरतात फायदेशीर

केस हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. केस लांबसडक, दाट असावेत असे प्रत्येकीला वाढते. पण काही कारणांनी केस वाढत नसतील तर आपण कधी घरगुती तर कधी पार्लरमध्ये जाऊन काही ना काही उपाय करतो. पण त्याचाही म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. केस भरभर आणि लांबसडक व्हावेत यासाठी आपण १ सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत (Easy Home Remedy for Hair Growth). 

ज्यामुळे काही दिवसांत केस वाढायला तर मदत होईलच पण केस दाट होण्यासाठीही याचा नक्कीच फायदा होईल. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा उपाय करता येत असल्याने त्यासाठी फार खर्चही येत नाही. पाहूया यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि हा उपाय नेमका कसा करायचा...

साहित्य 

१. लसूण पेस्ट - १ चमचा 

२. कांदा पेस्ट - १ चमचा 

३. लवंग - ४ ते ५ 

४. आलं पेस्ट - १ चमचा 

५. खोबरेल तेल - अर्धी वाटी 

लावण्याची पद्धत 

१. आलं-लसूण आणि कांदा यांची बारीक पेस्ट तयार करुन घ्या.

२. एका सुती कापडात ही पेस्ट घालून त्यात लवंग घाला आणि त्याची पुरचुंडी करा. 

३. एका प्लास्टीकच्या ट्रान्सपरंट बाऊलमध्ये तेल घेऊन त्यात ही पुरचुंडी ठेवून द्या. 

४. पुरचुंडी ठेवलेला हा बाऊल पूर्ण दिवस उन्हात ठेवा.

५. त्यानंतर या पुरचुंडीतील तेल पुळून काढा आणि ते केसांना लावा. 

६. हे तेल रात्रभर केसांना लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी केस शाम्पूने धुवा. 

७. आठवड्यातून एकदा हा प्रयोग केला तर केस लांब होण्यास मदत होईल. 

फायदे 

१. या उपायामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल. तसेच केस सॉफ्ट आणि शायनी होण्यासही याचा चांगला उपयोग होईल. 
२. यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते आणि केस दाट होण्यासही याची चांगली मदत होते. 
३. केस खूप पातळ असतील तर ते दाट होण्यास हा उपाय फायदेशीर ठरतो. 

Web Title: Easy Home Remedy for Hair Growth : Hair not growing? 1 simple home remedy, hair will grow longer and thicker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.