Join us  

चेहऱ्यावर खूप पिंपल्स आल्याने सौंदऱ्यात बाधा? १ सोपा घरगुती उपाय, पिंपल्स होतील गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 4:39 PM

Easy Home Remedy For Hormonal Acne : विविध उत्पादने लावून पिंपल्स लपवण्यापेक्षा पिंपल्स घालवण्याचा घरगुती उपाय...

वाढते प्रदूषण, पचनाशी निगडीत समस्या, ताणतणाव, हार्मोन्सचे असंतुलन तसेच सौंदर्यप्रसाधनांचा वाढता वापर यांमुळे पिंपल्सची समस्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पिंपल्स एकदा यायला सुरुवात झाली की हळूहळू ते वाढत जातात आणि मग संपूर्ण चेहरा भरुन जातो. यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा तर येतेच पण एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर आपल्याला मेकअपही करता येत नाही. अनेकदा हे पिंपल्स हात लागून फुटतात आणि त्याठिकाणी डाग पडतात. हे डाग पुढे बरेच दिवस तसेच राहत असल्याने चेहरा आणखीनच खराब दिसायला लागतो. अशावेळी नेमकं काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. तर चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी आज आपण वरुन करण्याचा नाही तर पोटातून घेण्याचा एक अतिशय सोपा उपाय पाहणार आहोत. यामुळे हार्मोन्सचे बिघडलेले संतुलन जागेवर येण्यास मदत होईल. पाहूयात हा उपाय नेमका काय आणि तो कसा करायचा (Easy Home Remedy For Hormonal Acne). 

१. साधारण १ ग्लास पाण्यात अर्धी वाटी धणे, १० ते १५ कडीपत्त्याची पाने आणि जवळपास वाटीभर गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या. 

(Image : Google)

२. हे पाणी गॅसवर चांगले उकळू द्यायचे आणि थोडे थंड झाल्यावर एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे. 

३. वरील सर्व पदार्थांचा अर्क उतरलेले हे पाणी हळूहळू प्यायचे, चेहऱ्यावरचे पिंपल्स जाण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. 

४. या पेयामध्ये व्हिटॅमिन ए आणि कोलेजन चांगल्या प्रमाणात असल्याने हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आलेले पिंपल्स जाण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. 

धणे, कडीपत्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांचे फायदे...

१. धणे 

चेहऱ्यावरच्या बारीक रेषा आणि त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. मृत त्वचेच्या पेशी काढून त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहण्यासाठी धण्यांचा फायदा होतो. 

२. कडीपत्ता

चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखण्यासाठी आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी कडीपत्ता उपयुक्त ठरतो. काहीवेळा त्वचा लवकर वयस्कर दिसते तशी दिसू नये यासाठी कडीपत्ता फायदेशीर असतो. 

३. गुलाबाच्या पाकळ्या 

गुलाबामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. या दोन्ही घटकांमुळे कोलेजनची निर्मिती होण्यास मदत होते. त्वचा लवचिक आणि घट्ट राहण्यासाठी कोलेजन आवश्यक असल्याने गुलाबाच्या पाकळ्या फायदेशीर ठरतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआरोग्यहोम रेमेडी