Join us  

केस काही केल्या वाढतच नाहीत?; लांबसडक, सिल्की केसांसाठी सोपा घरगुती उपाय-दिसाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2023 1:01 PM

Easy Home Remedy for Long and Shiny Hair : घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन केस लांबसडक, सिल्की करण्यासाठी नेमके काय करायचे याविषयी...

आपले केस लांबसडक, काळेभोर असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण काही ना काही कारणाने केस इतके गळतात की ते खूप पातळ होऊन जातात. कधी प्रदूषण किंवा केमिकल असलेल्या उत्पादनांचा अतिवापर केल्याने केस रुक्ष होतात. केसांत कोंडा होणे, केस पांढरे होणे, पातळ होणे या समस्या तर बहुतांश महिलांना भेडसावतात. अनुवंशिकता, आहारातून मिळणारे पोषण आणि इतरही अनेक घटक यासाठी कारणीभूत असतात. पण केस लांबसडक, दाट आणि मस्त शायनी असतील तर आपल्या सौंदर्यात निश्चितच भर पडते (Easy Home Remedy for Long and Shiny Hair).

अशा केसांसाठी एकतर आपण बाजारात मिळणारी महागडी उत्पादनं वापरतो किंवा पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपयांच्या ट्रिटमेंटस घेतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. कारण यामुळे केस तात्पुरते चांगले दिसत असले तरी कालांतराने केसांचा पोत आहे त्याहून जास्त खराब होत जातो. त्यामुळे केसांवर नैसर्गिक उपचार केलेले केव्हाही चांगले. पाहूयात घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन केस लांबसडक, सिल्की करण्यासाठी नेमके काय करायचे ...

(Image : Google)

उपाय काय करायचा?

केस हेल्दी, सिल्की आणि मुलायम होण्यासाठी केसांना कोरफडीचा गर, केळं आणि खोबरेल तेल लावावं. यामुळे केस सिल्की होण्यास मदत होते. यासाठी एका बाऊलमध्ये २ केळी स्मॅश करावीत. यामध्ये ४ ते ५ चमचे खोबरेल तेल घालावे. यामध्ये कोरफडीचा गर घालावा. हे सगळे मिश्रण चांगले एकजीव करुन केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत ब्रशने किंवा हाताने केसांना लावावे. १ ते २ तास हा हेअर मास्क केसांवर तसाच ठेवून नंतर पाण्याने आणि मग शाम्पू आणि कंडीशनरने केस धुवावेत. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय करावा. 

केळ्याचे फायदे

१. केसांना फाटे फुटले असतील तर केळं लावल्याने हे फाटे कमी होतात. 

२. केळ्यामुळे केस स्मूद आणि शायनी होतात. 

(Image : Google)

३. केसांचा कोरडेपणा दूर होऊन केस मुलायम होण्यास मदत होते. 

कोरफडीचे फायदे 

१. कोरफडीच्या गरात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी असते, ज्यामुळे केसांचे पोषण होते.

२. या जेलमध्ये असलेले अँटीऑक्सिडंटस केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. 

३. यामध्ये असणारे अँटी बॅक्टेरीयल गुण केसांना विविध प्रकारच्या इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करतात. 

खोबरेल तेलाचे फायदे

१. केसांना मॉईश्चर मिळण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरते. 

२. तसेच केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी या तेलाचा अतिशय चांगला उपयोग होतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी