Join us  

केसांत कंगवा घातला की मोठा गुंता निघतो? घरीच करा १ सोपा उपाय, केसगळती होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 2:04 PM

Easy Home Remedy to reduce hair fall : पार्लरच्या ट्रिटमेंटस किंवा केमिकल असलेली उत्पादने वापराचा तात्पुरता फायदा होतो...

आपले केस दाट, सिल्की, लांबसडक असावेत अशी बहुतांश महिलांची इच्छा असते. मात्र कधी केस कमी वयात पांढरे होतात तर कधी त्यात कोंडा होतो. कधी गळाल्याने विरळ होतात तर कधी खूप रुक्ष. केसांच्या या समस्यांसाठी नेमकं काय करावं तेही आपल्याला अनेकदा कळत नाही. मग आपण एकतर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटस घेतो किंवा हजारो रुपयांची उत्पादने लावून केस चांगले दिसावेत यासाठी प्रयत्न करत राहतो. पण अशाने केस तात्पुरते चांगले दिसतात आणि पुन्हा पूर्वपदावर येतात (Easy Home Remedy to reduce hair fall). 

केसांतून कंगवा फिरवला की जमिनीवर केसांचा मोठा गुंतोळा पडत असेल आणि हात घातला की केस तुटून बाहेर येत असतील तर आपल्याला त्यांची योग्य ती काळजी घ्यायला हवी. काही गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास आपले केसही दाट आणि लांबसडक होऊ शकतात. घरच्या घरी करता येईल असा १ सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. पूनम देवनानी यांनी हा उपाय इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सांगितला असून तो केल्यास केसांचे गळणे कमी होऊन केस वाढण्यासही मदत होईल. 

(Image : Google)

१. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. 

२. साधारण २० ते २५ पाने आणि  बारीक चिरलेल्या काड्या मिक्सरच्या भांड्यात घाला.

३. यामध्ये कोरफडीचे एक पान बारीक चिरुन घाला आणि अंदाजे थोडे पाणी घाला. 

४. तयार झालेले हे मिश्रण एका बाऊलमध्ये गाळणीने गाळून घ्यायचे. 

५. रात्रभर केसांना तेल लावून झोपावे आणि सकाळी या मिश्रणात एखादा हलका शाम्पू घालून हे मिश्रण शाम्पूप्रमाणे वापरावे.

६. यामुळे केसांचे गळणे तर कमी होतेच पण केसांचा पोत सुधारण्यासही मदत होते

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी