Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी ब्रँडेड क्रिम कशाला? घरीच करा १ खास क्रिम, चेहरा होईल उजळ

चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी ब्रँडेड क्रिम कशाला? घरीच करा १ खास क्रिम, चेहरा होईल उजळ

Easy Home Remedy to Remove Pigmentation, Dark Spot, Acne, Dark Circle : घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 01:14 PM2023-07-12T13:14:07+5:302023-07-12T13:18:30+5:30

Easy Home Remedy to Remove Pigmentation, Dark Spot, Acne, Dark Circle : घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

Easy Home Remedy to Remove Pigmentation, Dark Spot, Acne, Dark Circle : Why Branded Face Creams? Make 1 special cream at home, the face will be brighter | चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी ब्रँडेड क्रिम कशाला? घरीच करा १ खास क्रिम, चेहरा होईल उजळ

चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी ब्रँडेड क्रिम कशाला? घरीच करा १ खास क्रिम, चेहरा होईल उजळ

आपला चेहरा अभिनेत्रींप्रमाणे छान तजेलदार आणि नितळ असावा अशी प्रत्येक महिलेची अपेक्षा असते. पण काही ना काही कारणाने त्वचेच्या तक्रारी उद्भवतात आणि आपण निराश होतो. मग आपण छान दिसावे यासाठी पार्लरमधल्या महागड्या ट्रिटमेंटस घेण्यापासून ते बाजारात मिळणारी विविध सौंदर्यप्रसाधने वापरण्यापर्यंतचे अनेक उपाय अगदी तरुण वयापासून मुली करतात. त्याने तात्पुरता फरक पडतो मात्र कायमस्वरुपी उपाय होतोच असं नाही. कधी चेहऱ्यावर खूप डाग पडलेले असतात तर कधी खूप पुरळ येते.

डोळ्यांखाली काळे डाग, कमी वयात आलेल्या सुरकुत्या यामुळे आपण वैतागून जातो. मात्र घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. विशेष म्हणजे यासाठी फारसा खर्च येत नसल्याने हे उपाय आपण अगदी सहज करु शकतो. पाहूयात चेहऱ्याच्या समस्या दूर करण्याचा १ सोपा उपाय (Easy Home Remedy to Remove Pigmentation, Dark Spot, Acne, Dark Circle)..

(Image : Google)
(Image : Google)

१. एक बटाटा घेऊन तो स्वच्छ धुवायचा आणि सालीसकट किसून घ्यायचा. 

२. त्यानंतर गाळणीच्या साह्याने हा किस गाळून त्याचा रस काढायचा.  

३. साधारणपणे १५ मिनीटे हा गाळलेला रस तसाच ठेवायचा म्हणजे बटाट्याचा स्टार्च खाली राहील आणि पाणी वर येईल. 

४. वरचे पाणी काढून टाकल्यावर खाली पांढरा थर दिसेल त्या स्टार्चमध्ये साधारण १ चमचा कोरफडीची जेल घालायची. 

५. बाजारात मिळणाऱ्या व्हिटॅमिन इ ऑइलच्या २ कॅप्सूल यामध्ये घालायच्या आणि हे मिश्रण चांगले एकजीव करायचे. 


६. एका छोट्या डबीत ही क्रिम भरुन ठेवायची आणि रात्री झोपताना, दुपारी किंवा अगदी सकाळी उठल्यावर ही क्रीम चेहऱ्याला लावायची. 

७. साधारणपणे अर्धा तास ही क्रिम चेहऱ्यावर तशीच ठेवून नंतर चेहरा धुवून टाकायचा. यामुळे चेहऱ्यावरील डाग, पुरळ, काळेपणा पूर्ण दूर व्हायला मदत होईल. 

Web Title: Easy Home Remedy to Remove Pigmentation, Dark Spot, Acne, Dark Circle : Why Branded Face Creams? Make 1 special cream at home, the face will be brighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.