आपली त्वचा उजळ आणि नितळ असावी असे आपल्या सगळ्यांनाच वाटते. मात्र काही ना काही कारणाने त्वचा टॅन होते आणि आपला मूळ रंग बदलतो. यातही आपण सावळे असू तर हा रंग जास्तच काळपट वाटायला लागतो. तसेच टॅनिंग झाल्याने अनेकदा आपल्याला शॉर्ट ड्रेस किंवा स्लिव्हलेस कपडे घालण्यावरही बंधने येतात. आपण उन्हातान्हात आणि प्रदूषणात फिरतो त्यामुळे आपली त्वचा टॅन होते. इतकेच नाही तर काहीवेळा स्विमिंग किंवा अन्य काही कारणांमुळेही शरीराला काळपटपणा येतो (Easy Home Remedy to Remove Skin Tanning).
चेहऱ्यासाठी आपण वेगवेगळे फेस पॅक वापरुन किंवा काही ना काही उपाय करुन हे टॅनिंग घालवतो. पण हाताचे आणि पायाचे टॅनिंग कसे घालवायचे हा मात्र आपल्यापुढील महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे हाताचा आणि पायाचा काळेपणा निघण्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेण्याशिवाय पर्याय नसतो. व्हॅक्सिंग केले तरी हे टॅनिंग म्हणावे तसे निघत नाही. तसेच ब्लिचमुळे ते तात्पुरते झाकले जाते मात्र पुन्हा आहे तसेच दिसते. तसेच या ट्रिटमेंटससाठी एकतर खूप पैसे लागतात आणि त्वचाही खराब होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक उपायांनी हाता-पायांचा काळेपणा दूर करता आला तर? पाहूयात हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा?
१. एका बाऊलमध्ये २ चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे.
२. यात अर्धा चमचा बेकींग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळायचा.
३. यामध्ये थोडे दूध घालून हे मिश्रण चांगले एकजीव करायचे.
४. शरीरावर ज्याठिकाणी खूप टॅनिंग झाले आहे तिथे हे घट्टसर मिश्रण लावून ठेवायचे.
५. साधारणपणे १५ मिनीटे हे मिश्रण ठेवून त्यानंतर धुवायचे.
६. आठवडयातून किमान एकदा हा प्रयोग केल्यास टॅनिंग दूर होण्यास निश्चितच मदत होते.