Join us  

केस गळून गळून पातळ झाले? १ सोपा उपाय, केसगळती होईल कमी, केस वाढतील भरभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2024 9:40 AM

Easy home remedy to stop hair fall : घरच्या घरी करता येईल असा हा उपाय एक-दोनदा केला तरी केसगळती कमी होण्यास मदत होते.

आपले केस लांबसडक आणि दाट असावेत असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. केसांना सतत वेगवेगळी तेलं लावणे, नियमित शाम्पू करणे हे तर करतोच. पण केसांचा पोत सुधरावा यासाठी आपण काही घरगुती हेअर मास्क लावणे किंवा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट करणे असे बरेच उपाय करत असतो. पण पार्लरची ट्रिटमेंट काही दिवसच टिकते आणि त्यासाठी खर्चही खूप जास्त होतो. तसेच या उपायांचा त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. काही ना काही कारणाने केस गळत राहतात आणि दिवसेंदिवस पातळ होत राहतात (Easy home remedy to stop hairfall). 

एकदा केस पातळ व्हायला सुरुवात झाली की ते पुन्हा जाड व्हावेत यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात.अशावेळी घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. मेथ्या या शुगर नियंत्रणात राहण्यासाठी तसेच इतरही काही समस्यांसाठी उपयुक्त असतात त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी आणि केसगळती कमी होण्यासाठीही मेथ्यांचा चांगला उपयोग होतो. पाहूयात मेथ्यांचा केस गळू नयेत म्हणून नेमका कसा वापर करायचा. अगदी घरच्या घरी करता येईल असा हा उपाय एक-दोनदा केला तरी केसगळती कमी होण्यास निश्चितच मदत होते. 

१. साधारण २ ते ३ चमचे मेथीचे दाणे घेऊन ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे. 

(Image : Google)

२. दुसऱ्या दिवशी हे पाण्यात भिजलेले मेथीचे दाणे त्याच पाण्यात चांगले उकळायचे. 

३. गार झाल्यावर या मेथीच्या दाण्यांची बारीक पेस्ट तयार करायची. 

४. ही पेस्ट गाळणीने गाळून घ्यायची. खाली आलेले लिक्वीड केसांना लावण्यासाठी तयार होते. 

५. या लिक्विडमध्ये बदाम तेल किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सुल घालायची आणि ते मिश्रण चांगले एकत्र करायचे. 

६. केसांच्या मुळांना हे मिश्रण अतिशय हळुवार पद्धतीने लावायचे.

७. काही वेळ केस असेच बांधून ठेऊन त्यानंतर नेहमीप्रमाणे शा धुवावेत. 

८. या उपायामुळे केस गळती कमी होण्यास मदत होईल. इतकेच नाही तर नव्याने केसांची चांगली वाढ होईल

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी