गौरी गणपती म्हणजे वर्षभरातून येणारा मोठा सण. या काळात आपण एकमेकांच्या घरी दर्शनासाठी जातो. तसेच आपल्या घरीही बरेच पाहुणे येतात. त्यामुळे आपण छान दिसण्यासाठी मेकअप करतो. पण अनेकदा घाईगडबडीत आपल्याला मेकअप करण्यासाठीही वेळ नसतो. अशावेळी आपण झटपट चेहऱ्याला काहीतरी लावतो, काजळ आणि लिपस्टीक लावतो आणि जातो. पण त्यामुळे आपल्याला मेकअपचा छान लूक येतोच असे नाही. मेकअपसाठी प्रायमर, फाऊंडेशन, कन्सिलर अशा अनेक गोष्टी एकावर एक लावतो. यासाठी बराच वेळ लागतो आणि ते लावण्यासाठी आपल्याकडे तेवढे पेशन्स असावे लागतात (Easy Make up Guide for Beginners How to look beautiful in festive season).
मात्र हे सगळे करायचे नसेल झटपट अगदी ५ मिनीटांत मेकअप करण्याची सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. यामुळे अगदी कमी वेळात आपला मेकअप होईल, चेहऱ्यावर मस्त शाईन येईल आणि चेहरा एकदम एकसारखा दिसण्यास मदत येईल. बरेचदा आपल्याला चेहऱ्यावरचे डाग, फोड किंवा खड्डे झाकायचे असल्याने मेकअप करण्याशिवाय पर्याय नसतो. यासाठीच ही ट्रिक वापरल्यास आपण सगळ्यांमध्ये मस्त उठूनही दिसू शकू. प्रसिद्ध ब्यूटी एक्सपर्ट रोहीत सचदेवा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून ही सोपी ट्रिक आपल्यासोबत शेअर करतात. पाहूयात ही भन्नाट ट्रिक नेमकी काय आहे...
१. सगळ्यात आधी आपल्याकडे असलेले कोणत्याही कंपनीचे एक व्हाईटनिंग डे क्रिम घ्यायचे.
२. त्यामध्ये आपल्या हायलायटर पॅलेटमधून आवडीच्या रंगाचे छानसे पावडर हायलायटर घालायचे.
३. मग यात आपण नेहमी वापरत असलेले थोडे लिक्विड फाऊंडेशन घेऊन ते यामध्ये घालायचे.
४. हे सगळे एका पॅलेटमध्ये चांगले एकत्र करुन घ्यायचे आणि ब्यूटी ब्लेंडरने हे मिश्रण चेहऱ्याला एकसारखे लावून घ्यायचे.
५. हे लावण्याआधी चेहऱ्याला प्रायमर लावला तर चेहरा आणखी जास्त खुलण्यास मदत होईल. ६. अशाप्रकारे झटपट होणारा मेकअप केल्यास तुम्ही पार्लरमध्ये मेकअप करुन आलाय असे सगळ्यांना वाटेल.