Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीत फक्त ३ गोष्टी वापरुन करा झटपट मेकअप, कमी वेळात व्हा तयार- दिसा सुंदर...

दिवाळीत फक्त ३ गोष्टी वापरुन करा झटपट मेकअप, कमी वेळात व्हा तयार- दिसा सुंदर...

Easy Makeup Tips With only 3 Products look Beautiful in Diwali : कमीत कमी उत्पादनांमध्ये आपण स्वत:चा लूक खुलवू शकलो तर किती छान होईल नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 12:42 PM2022-10-13T12:42:10+5:302022-10-13T12:57:19+5:30

Easy Makeup Tips With only 3 Products look Beautiful in Diwali : कमीत कमी उत्पादनांमध्ये आपण स्वत:चा लूक खुलवू शकलो तर किती छान होईल नाही का?

Easy Makeup Tips With only 3 Products look Beautiful in Diwali : Just 3 things to do Diwali makeup in no time, get ready in no time - look beautiful... | दिवाळीत फक्त ३ गोष्टी वापरुन करा झटपट मेकअप, कमी वेळात व्हा तयार- दिसा सुंदर...

दिवाळीत फक्त ३ गोष्टी वापरुन करा झटपट मेकअप, कमी वेळात व्हा तयार- दिसा सुंदर...

Highlightsमीत कमी गोष्टींमध्ये परफेक्ट मेकअप लूक मिळवण्यासाठी या टिप्स नक्कीच उपयोगी पडू शकतात. यंदाच्या दिवाळीत किंवा एरवीही तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करुन पाहा. 

दिवाळी म्हटली की खरेदी, घराची साफसफाई, सजावट, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ असे सगळे आपल्या डोळ्यासमोर येते. महाराष्ट्रातील या मोठ्या सणाला एकमेकांना भेटायचे तर आपण सगळ्यांमध्ये उठून तर दिसायला हवे. त्यासाठी आपण आवर्जून मेकअप करतो. आता मेकअप म्हटला की वेगवेगळ्या ब्रँडची बरीच उत्पादने आणि त्यासाठी लागणारा पैसा, वेळ असे सगळेच आले. पण सणावाराच्या दिवसांत कमीत कमी उत्पादनांमध्ये आपण स्वत:चा लूक खुलवू शकलो तर किती छान होईल नाही का? आता हे कसे करायचे यासाठी आज आपण काही खास टिप्स पाहणार आहोत (Easy Makeup Tips With only 3 Products look Beautiful in Diwali). 

(Image : Google)
(Image : Google)

१. फाऊंडेशन

चेहऱ्याला एकसारखेपणा येण्यासाठी आणि चेहऱ्यावरचे डाग, खड्डे झाकले जाण्यासाठी फाऊंडेशन लावणे अतिशय आवश्यक असते. यामुळे चेहरा हायलाईट व्हायला मदत होतेच पण तो एकसारखा दिसतो. तर एखादं मॅट फिनीशचं लिक्वीड फाऊंडेशन घेऊन ते चेहऱ्यावर सगळीकडे एकसारखं लावावं. डोळ्याखाली अगदी गळ्यालाही या फाऊंडेशनचा चांगला कोट दिला तर चेहरा मस्त दिसतो. 

२. काजळ आणि लायनर पेन्सिल

डोळे हायलाईट करण्यासाठी आपण सगळेच काजळ वापरतो. सध्या बाजारात काजळ आणि लायनर एकाच पेन्सिलने लावता येतील अशा बऱ्याच पेन्सिल मिळतात. यामुळे डोळे खुलून येण्यास मदत होते. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचेही लायनर आणि काजळ तुम्ही आवडत असेल तर ट्राय करु शकता. तुमच्या भुवया फिकट असतील तर हीच पेन्सिल हलक्या आताने भुवयांवरुन फिरवल्यास डोळे आणखी उठून दिसण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. लिपस्टीक

सणावाराला आणि एरवीही बाहेर पडताना आपण सगळेच लिपस्टीक लावतो. कपड्यांना मॅच होईल अशी आणि समारंभाचा प्रकार लक्षात घेऊन आपण लिपस्टीकच्या शेडची निवड करतो. ही लिपस्टीक लावून झाल्यावर बोटाने तीच शेड थोडी आपल्या चिक बोन्सवर आणि आय शॅडो म्हणून लावल्यास आपल्याला परफेक्ट मेकअप लूक मिळू शकतो.

एखादवेळी आपल्याला प्रवास करुन कुठे जायचे असेल किंवा आपल्याला आवरायची खूप घाई असेल तर एकावेळी जास्त मेकअप प्रॉडक्ट कॅरी करणे, वापरणे शक्य नसते अशावेळी कमीत कमी गोष्टींमध्ये परफेक्ट मेकअप लूक मिळवण्यासाठी या टिप्स नक्कीच उपयोगी पडू शकतात. तेव्हा यंदाच्या दिवाळीत किंवा एरवीही तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करुन पाहा. 

Web Title: Easy Makeup Tips With only 3 Products look Beautiful in Diwali : Just 3 things to do Diwali makeup in no time, get ready in no time - look beautiful...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.