Join us  

घरीच तयार करा नॅचरल हेअर डाय; ऐन तारुण्यात पांढरे झालेले केस होतील काळेभोर, साईड इफेक्टही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 12:23 PM

Easy Natural Home Remedy to Turn White Hairs Into Black with Home Made Hair Dye : घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास आपले केस नैसर्गिकरित्याच काळे होऊ शकतात.

केस पांढरे होणं ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी वयाच्या पन्नाशीत पांढरे होणारे केस आता ऐन पंचविशीत किंवा तिशीतच पांढरे व्हायला लागतात. याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात, पण प्रामुख्याने अनुवंशिकता, शरीरात काही घटकांची कमतरता असल्याने, प्रदूषण, केमिकल उत्पादनांचा अतिवापर तर कधी आणखी काही कारणांनी कमी वयात केस पांढेर होतात. एकदा केस पांढरे झाले की आपण वयस्कर दिसायला लागतो. सगळे आपल्याला म्हातारी म्हणून चिडवायला लागतात. पांढऱ्या केसांमुळे काही वेळा आत्मविश्वास कमी झाल्याचे किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. कमी वयातच केस पांढरे झाल्यामुळे आपण तणावात येतो आणि या केसांचे प्रमाण वाढायला लागले की मग काय करायचे आपल्याला काहीही सुचत नाही (Easy Natural Home Remedy to Turn White Hairs Into Black with Home Made Hair Dye). 

पांढऱ्या झालेल्या केसांना डाय किंवा मेहेंदी लावणे असे २ पर्याय आपल्याकडे असतात. मात्र त्यासाठी सतत पार्लरमध्ये जाणे, पैसे खर्च करणे अशा सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच. सतत हेअर डाय केल्याने केसांचा पोत बिघडण्याची शक्यता असते. हेअर डायमध्ये असणारी रसायने केस खराब तर करतातच पण यामुळे केसांच्या इतर समस्या वाढू शकतात. त्यामुळे डायपेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास आपले केस नैसर्गिकरित्याच काळे होऊ शकतात. आता घरच्या घरी उपाय म्हणजे नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन घरीच हेअर डाय तयार केल्यास त्याचा केस काळे होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. 

१. एका पॅन किंवा कढईमध्ये २ चमचे कलौंजीच्या बिया चांगल्या भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये याची बारीक पूड करुन घ्या.

२. लोखंडाच्या कढईमध्ये ही पावडर घालून त्यात १ चमचा पारंपरीक मेहेंदी आणि १ चमचा भृंगराज पावडर घाला. 

३. यामध्ये अर्धी वाटी मोहरीचे तेल घालून हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या आणि रात्रभर लोखंडाच्या कढईत हे भिजत ठेवा. 

४. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नैसर्गिक असा हा हेअरडाय केसांना लावण्यासाठी तयार असेल. नेहमीप्रमाणे आपण जसा डाय लावतो तसाच लावून ठेवायचा आणि अर्धा ते १ तास ठेवून नंतर केस धुवून टाकायचे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी