आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला किंवा पार्टीला जायचे असेल तर हेअरस्टाईल काय करायची असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. कपडे, दागिने, मेकअप याबाबत आपण नियोजन करतो पण हेअरस्टाईलबद्दल आपण म्हणावा तितका विचार करत नाही. एकतर केस मोकळे सोडणे किंवा एखादा बन करणे इतकेच आपल्याला सामान्यपणे येते आणि आपण आलटून पालटून तसेच काहीतरी करतो. पण एक साधीशी पेन्सिल घेतली आणि तिचा वापर करुन अगदी झटपट होणारी एखादी हेअरस्टाईल केली तर आपल्या लूकमध्ये लगेच बदल होतो (Easy Pencil Hairstyle).
फक्त एका पेन्सिलचा वापर करुन आपल्या लूकमध्ये इतका छान फरक पडणार असेल तर या हेअरस्टाईल एकदा नक्की ट्राय करायला हव्यात. इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर याचे वेगवेगळे बरेच व्हिडिओ असून थोडा प्रयत्न केला तर आपल्यालाही अगदी सहज या हेअरस्टाईल जमू शकतात. यामध्ये अगदी झटपट होणाऱ्या छोट्या हेअरस्टाईलपासून थोड्या अवघड पण दिसायला सुंदर अशा बऱ्याच हेअरस्टाईल दाखवण्यात आल्या आहेत.
लहान किंवा मोठ्या, कुरळ्या, स्ट्रेट अशा सर्व प्रकारच्या केसांसाठी या हेअरस्टाईल सूट होऊ शकतात. यासाठी आपण नेहमीच्या पेन्सिलचा किंवा थोड्या फॅन्सी प्रकारच्या पेन्सिलचाही वापर करु शकतो. आपला लूक यामुळे उठून तर दिसतोच पण आपल्या या हटके हेअरस्टाईलची सगळीकडेच चर्चा होऊ शकते.