Lokmat Sakhi >Beauty > केस गळून गळून पातळ झाले? घरीच करा १ खास पारंपरिक तेल, १५ दिवसांत दिसेल फरक

केस गळून गळून पातळ झाले? घरीच करा १ खास पारंपरिक तेल, १५ दिवसांत दिसेल फरक

Easy recipe of Secret Hair Oil to protect hair fall : केस लांबसडक वाढण्यासाठी आजीच्या रेसिपीने घरीच तयार करा तेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2024 12:15 PM2024-10-06T12:15:59+5:302024-10-06T12:28:29+5:30

Easy recipe of Secret Hair Oil to protect hair fall : केस लांबसडक वाढण्यासाठी आजीच्या रेसिपीने घरीच तयार करा तेल

Easy recipe of Secret Hair Oil to protect hair fall : Hair loss and thinning? Do it at home 1 special traditional oil, you will see the difference in 15 days | केस गळून गळून पातळ झाले? घरीच करा १ खास पारंपरिक तेल, १५ दिवसांत दिसेल फरक

केस गळून गळून पातळ झाले? घरीच करा १ खास पारंपरिक तेल, १५ दिवसांत दिसेल फरक

केस लांबसडक असतील तर महिलांचे सौंदर्य खुलून दिसते. लांबसडक केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाइल करता येत असल्याने आपल्यालाही वेगवेगळी फॅशन करता येते. पण काही ना काही कारणाने केस इतके गळायला लागतात की ते पातळ होऊन जातात. आहारातून मिळणारे पोषण, अनुवंशिक केसांची ठेवण, प्रदूषण, आपण वापरत असलेली उत्पादने अशा बऱ्याच गोष्टींचा आपल्या केस वाढण्यामध्ये आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यामध्ये सहभाग असतो (Easy recipe of Secret Hair Oil to protect hair fall ).   

बरेचदा आपण चांगले ब्रँडेड शाम्पू, कंडीशनर, सिरम आणि तेल वापरतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. केस इतके गळतात की अक्षरश: डोक्यावर शेपटी असल्यासारखे दिसायला लागते. मग मात्र आपल्याला केसांचा फारच चिंता वाटायला लागते आणि काय करावे ते कळत नाही. पण बाजारात मिळणारी उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी काही पारंपरिक गोष्टींचा वापर करुन तेल तयार केले तर त्याचा केसांची वाढ होण्यासाठी नक्कीच चांगला उपयोग होतो. पाहूयात हे तेल नेमके कसे तयार करायचे...

१. एका लोखंडी कढईत २०० ग्रॅम खोबरेल तेल गरम करायला ठेवा.

(Image : Google)
(Image : Google)

२. यात अर्धी वाटी आवळ्याचे काप, अर्धी वाटी कडीपत्ता, कोरफड, १ चमचा मेथी दाणे घाला.

३. यातच  १ चमचा काळे तीळ, १ चमचा जवस, ४ ते ५ जास्वंदाची फुलं घाला.

४. नंतर यामध्ये १ चमचा ब्राम्ही आणि १ चमचा भृंगराजची पाने, २ ते ३ कापूर वड्या आणि १ चमचा कडुनिंबाची पाने घाला.

५. हे सगळे मिश्रण साधारणपणे ५ मिनीटांसाठी मंद आचेवर चांगले उकळू द्या.

६. नंतर यामध्ये ५ मिलीग्रॅम एरंडेल तेल घालून २ ते ३ तासांसाठी हे तेल तसेच ठेवून द्या. 

७. नंतर हे तेल एका बरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये गाळून घ्या आणि नियमितपणे केसांना लावा.

तेलाचे फायदे 

१. केसगळती कमी होण्यास मदत होते. 

२. केस वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त 

(Image : Google)
(Image : Google)

३. केसांचा पोत सुधारतो. 

४. केसांची मुळे मजबूत होतात

५. कोंडा कमी होण्यास फायदेशीर 


 

Web Title: Easy recipe of Secret Hair Oil to protect hair fall : Hair loss and thinning? Do it at home 1 special traditional oil, you will see the difference in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.