Join us  

पाय गोरे पण गुडघे खूप काळे पडले? डॉक्टर सांगतात, ३ सोपे उपाय, गुडघेही दिसतील गोरेपान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2023 12:26 PM

Easy Remedies to Avoid Dark Knees : गुडघ्यांचा काळेपणा दूर होण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल अतिशय महत्त्वाची माहिती देतात.

ठळक मुद्देगुडघे काळे होण्यामागे नेमकी काय कारणं असतात आणि ते गोरे करण्यासाठी काय करु नये याविषयी...त्वचारोगतज्ज्ञ देतात मोलाचा सल्ला, सौंदर्यासाठी ठरेल उपयुक्त

आपण गोरं दिसावं असं प्रत्येकीला वाटतं. मात्र आपला रंग हा आपल्या हातात नसतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त स्वच्छ आणि नीटनेटकं राहणं हेच अधिक महत्त्वाचं असतं. अनेकदा आपला चेहरा, हात, पाय छान गोरेपान दिसतात पण शरीराचे काही भाग मात्र खूप काळे होतात. यामध्ये मान, कोपरं, काखेचा भाग, टाचा आणि गुडघे यांचा समावेश असतो. आपल्या इतर अवयवांचा रंग वेगळा असतो आणि हे भाग त्यापेक्षा जास्त काळे असतात. कधी आपण थोडे शॉर्ट कपडे घातले तर गुडघ्याचा हा भाग काळा पडल्याचे दिसून येते (Easy Remedies to Avoid Dark Knees). 

गुडघे काळे पडले म्हणून काही वेळा आपण त्याला साबणाने, गॉझने घासतोही. पण ते म्हणावे तसे स्वच्छ होतातच असे नाही. आता अशाप्रकारे गुडघे काळे पडण्यामागे नेमकी काय कारणं असतात, काय केल्याने गुडघ्यांचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल याविषयी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल अतिशय महत्त्वाची माहिती देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्या याविषयीच्या काही टिप्स शेअर करतात, त्या कोणत्या पाहूया...

(Image : Google)

गुडघ्याचा भाग काळा दिसण्याची कारणं...

१. हायपरपिगमेंटेशन२. त्वचा जाड होणे.३. त्वचेचे घर्षण होणे४. सोरायसिस किंवा एक्झिमा५. लठ्ठपणा 

हे चुकीचे उपाय टाळा

१. खूप घट्ट कपडे घालणे२. गुडघे जोरजोरात घासणे ३. बेकींग सोड्याने घासणे यांसारखे चुकीचे घरगुती उपाय

गुडघ्याचा काळेपणा दूर करण्याचे उपाय...

१. बाजारात मिळणारे एखादे चांगले पिलींग सोल्यूशन १० मिनीटे लावून ठेवा. नंतर पाण्याने गुडघे धुवा आणि मग मॉइश्चरायजर लावा. हा उपाय आठवड्यातून एकदा करा. 

२. दिवसातून २ वेळा मॉईश्चरायजर लावणे आवश्यक आहे. ज्या मॉईश्चरायजरमध्ये युरीया किंवा लॅक्टीक अॅसिड असेल असे मॉईश्चरायजर लावल्यास याठिकाणची त्वचा एक्सफॉलिएट होण्यास मदत होईल. तसेच कोरडेपणामुळे काळवंडलेपणा आला असेल तर मॉईश्चरायजरमुळे कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल. 

३. स्कीन लायटनिंग क्रिम्स लावणे हा आणखी एक चांगला उपाय आहे. त्वचेमध्ये होणारी मेलानिनची निर्मिती कमी होण्यास याचा चांगला उपयोग होतो. टायरोडीन लोशन किंवा बायो व्हाईट एचके हे रात्री झोपताना आवर्जून लावा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी