Join us  

उन्हामुळे पायावर चपलेचे चट्टे, मान-हात काळे पडले? १ सोपा उपाय-टॅनिंग जाईल-दिसाल उजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2024 9:52 AM

Easy remedy to remove slipper marks and hand-neck tanning instantly : टॅनिंग घालवण्यासाठी नेमके काय करायचे पाहूया..

उन्हाने किंवा अन्य काही कारणांनी आपली त्वचा चांगलीच टॅन होते. हे टॅनिंग घालवणे एक अतिशय अवघड काम असते. कारण ते त्वचेच्या आतपर्यंत गेलेले असल्याने वरचेवर उपाय करुन त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. आपण चप्पल किंवा सँडल घातल्यावर पायाचा जो भाग मोकळा राहतो त्याठिकाणी काळे पट्टे तयार झाल्याचे दिसते. इतकेच नाही तर हाताच्या पंज्याचा वरचा भाग, मानेचा भाग ऊन आणि घामाने काळाकुट्ट होऊन जातो. हा काळपटपणा हळूहळू इतका वाढतो की तो काही केल्या कमी होत नाही (Easy remedy to remove slipper marks and hand-neck tanning instantly). 

अशावेळी आपल्याला एकतर शरीराचा हा भाग लपवावा लागतो. पण सतत असे लपवणे शक्य नसते. मग आपण पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार करतो आणि टॅनिंग घालवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यासाठी खूप जास्त प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. अशाप्रकारे पैसे खर्च करुनही त्याचा म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. मग हे टॅनिंग घालवण्यासाठी नेमके काय करायचे हे आपल्याला कळत नाही. इन्स्टाग्रामवरील ब्युटी विथ फरहाट या चॅनेलने नुकताच ही समस्या कमी करण्यासाठी घरच्या घरी करता येईल असा सोपा उपाय सांगितला आहे. यामुळे आपले तळहाताचे, मानेचे टॅनिंग कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. हा उपाय नेमका काय आणि तो कसा करायचा पाहूया.. 

(Image : Google)

१. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्यावे.

२. त्यामध्ये १ पाकीट इनो घालावे आणि मग त्यामध्ये १ चमचा खोबरेल तेल घालावे. 

३. त्यात १ चमचा बेसन घालून आपल्या आवडीचा कोणताही शाम्पूचा १ लहान सॅशे घालायचा. 

४. सगळ्यात शेवटी एका लिंबाचा रस यामध्ये घालून हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.

५. हे मिश्रण जो भाग काळा झाला आहे त्याठिकाणी लावून ४ ते ५ मिनीटे चांगला मसाज करावा.

६. त्यानंतर पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावे.

७. एकदा हा उपाय केला की लगेचच तुम्हाला टॅनिंग कमी झाल्याचे लक्षात येईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी