Join us  

ब्लॅक हेड्समुळे चेहरा काळपट दिसतो? घरच्याघरी ब्लॅकहेड्स काढण्याची १ सोपी ट्रिक, चेहरा उजळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 12:54 PM

Easy Simple and natural home remedy to remove blackheads : पार्लरच्या उपायांपेक्षा नैसर्गिक उपाय केव्हाही जास्त चांगले...

ब्लॅकहेड्स ही चेहऱ्याचे सौंदर्य खराब करणारी एक महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे चेहरा विनाकारण खराब दिसतो आणि हे ब्लॅकहेड्स त्वचेमध्ये रुतून बसलेले असल्याने ते सहजासहजी निघत नाहीत. साधारणपणे नाकाच्या आजुबाजूचा भाग, हनुवटीचा भाग अशाठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्लॅकहेड्स येतात. हे ब्लॅकहेडस आपल्याला सहजासहजी काढणे शक्य नसते त्यामुळे आपण पार्लरमध्ये जाऊन फेस क्लीन अप किंवा फेशियल असे काहीतरी करतो. मग त्याठिकाणी चेहऱ्याला वाफ दिल्यानंतर काही उपकरणांच्या साह्याने हे ब्लॅकहेड्स काढले जातात (Easy Simple and natural home remedy to remove blackheads). 

त्यामुळे त्वचा काही प्रमाणात दुखते पण चेहऱ्यामध्ये अडकलेले हे काळे कण निघून जाण्यास मदत होते. ब्लॅक हेड्ससोबतच व्हाईट हेड्सचाही त्रास अनेकांना असतो. त्वचेची रंध्रे ओपन झाल्यावर त्यामध्ये वातावरणातील घाण, धूळ अडकल्याने या समस्या निर्माण होतात. पण त्यासाठी लगेचच पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी काही सोप्या उपायांनी या समस्या दूर होण्याची शक्यता असते. पाहूयात ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी नेमकं काय करायचं. 

१. लिंबू हा ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी अतिशय चांगला आणि सोपा उपाय आहे हे लक्षात घ्या. 

(Image : Google)

२. लिंबाचा रस घेऊन तो ब्लॅकहेड्स ज्याठिकाणी आले आहेत तिथे लावून ठेवावा.

३. काही वेळ हा ज्यूस असाच ठेवायला हवा त्यामुळे चेहऱ्यावर त्याचा परीणाम होतो आणि ब्लॅकहेड्स निघण्यास मदत होते. 

४. लिंबामध्ये असलेले सायट्रीक अॅसिड असते त्यामुळे ब्लॅकहेड्स तयार करणारे चेहऱ्यावरचे तेल कमी होण्यास मदत होते. 

५. लिंबू आपल्या घरात सहज असणारी गोष्ट आहे, तसेच यासाठी फार वेगळे काही करावे लागत नसल्याने हा उपाय आपण नक्कीच ट्राय करु शकतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी