Join us  

Easy Simple Hairstyles : पातळ केसांमुळे कोणतीच हेअरस्टाईल शोभत नाही? पातळ केस थिक दिसण्यासाठी या हेअरस्टाईल्स करा ट्राय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 4:02 PM

Easy Simple Hairstyles for Medium Hair : केसांना मशीनचा वापर करून स्ट्रेटनिंग किंवा करली लूक देऊ शकता. कोणतीही हेअर स्टाईल करण्याआधी केसांवर सिरम अप्लाय करा जेणेकरून हेअरस्टाईल जास्त वेळ चांगली राहिल आणि केस चमकदार दिसतील.

(Image Credit - wittyvows)

महिलांच्या टेंशनचं सर्वात मोठं कारण म्हणजे पातळ केस! जर तुमचे केस पातळ असतील तर कोणतीही केशरचना तुम्हाला शोभणार नाही. बाहेर जाण्यासाठी किंवा कोणत्याही पार्टी, फंक्शनमध्ये तुमचे केस अधिक सुंदर दिसण्यासाठी तुम्ही बनावट केसांचा किंवा कृत्रिम अंबाड्याचा देखील अवलंब करू शकता, परंतु प्रत्येक वेळी ते चांगले दिसत नाही. आज तुम्हाला अशाच 3 हेअरस्टाइल्स सुचवणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पातळ केसांनाही जाड आणि स्टायलिश लुक येईल. (Easy, Simple Hairstyles) 

१) केसांना मशीनचा वापर करून स्ट्रेटनिंग किंवा करली लूक देऊ शकता. कोणतीही हेअर स्टाईल करण्याआधी केसांवर सिरम अप्लाय करा जेणेकरून हेअरस्टाईल जास्त वेळ चांगली राहिल आणि केस चमकदार दिसतील.

२) तुम्हाला हेअरस्टाईल करण्यासाठी फारसा वेळ नसेल तर फक्त दोन ते तीन क्लिप्स लावून तुम्ही केस मोकळे ठेवू शकता.फुलांचा ब्रॉच किंवा ताजं फुल केसांना लावणं हासुद्धा एक बेस्ट पर्याय असू शकेल.

३) केसांचे दोन भाग करून किंवा समोरून पफ काढून तुम्ही मागे बन बांधू शकता. र तुम्ही सिंपल बन किंवा स्टायलिश बन बांधणार असाल तर समोरचे केस कर्ल्स करायला विसरू नका.

1) लूप बन हेअरस्टाईल

२) बंप हेअरस्टाईल

३) वॉटरफॉल हेअरस्टाईल

४) सोप्या हेअरस्टाईल्स

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी