श्रावण महिना म्हटला की राखीपौर्णिमा, श्रावणी सोमवार, शुक्रवार, मंगळागौर, सत्यनारायणाची पूजा, त्यानंतर येणारे गौरी-गणपती असे काही ना काही कार्यक्रम घरोघरी सुरुच असतात. आपल्या घरात किंवा नातेवाईक मित्रमंडळींकडे या कार्यक्रमांसाठी जाताना आपण छान आवरुन जातो. घाईच्या वेळी मेकअप करायला पुरेसा वेळ नसेल तर आपण अगदीच काजळ आणि लिपस्टीक लावून याठिकाणी हजेरी लावतो. अशावेळी आपली त्वचा छान ग्लोईंग आणि चमकदार असेल तर ठिक नाहीतर आपल्याला खूप मेकअप करत बसावा लागतो. त्वचा नेहमी नितळ आणि सुंदर दिसावी यासाठी आपण पुरेसे लक्ष देत नाही. यामुळेच चेहऱ्यावर फोड येणे, पुटकुळ्या येणे, त्वचा कोरडी पडणे, डाग पडणे अशा समस्या निर्माण होतात. पण त्वचेच्या समस्या निर्माण होऊ नयेत आणि चेहरा कायम ग्लोईंग दिसावा यासाठी रोजच्या आयुष्यात काही किमान गोष्टी अवश्य करायला हव्यात. या गोष्टी कोणत्या आणि त्या कशा करायच्या याबाबत सांगताहेत योग अभ्यासक, स्मृती (Easy Skin Care Tips for Glowing Skin) .
चेहरा अभिनेत्रींसारखा चमकदार दिसावा तर आहारात घ्या ६ पदार्थ; त्वचा राहील नितळ-सुंदर
१. रोज २ फळं खावीत
रोजच्या रोज २ सिझनल फळं आवर्जून खायला हवीत. यामध्ये आपण फळांचा ज्यूस किंवा पॅकींगमध्ये येणारा ज्यूस घेणार नाही याची काळजी घ्यावी.
२. मोबाइलची स्क्रीन स्वच्छ ठेवावी
अनेकदा आपल्या मोबाइलचा स्क्रीन फोनवर बोलताना आपल्या चेहऱ्याला लागतो. या स्क्रीनला काही जीवाणू लागलेले असण्याची शक्यता असते. ही घाण त्वचेला लागली तर त्यातून काही इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून फोनची स्क्रीन जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.
३. ग्लासभर ज्यूस
ग्लासभर फळाचा ज्यूस पिणे अतिशय महत्त्वाचे आहे. हा ज्यास पॅक नसावा तसेत त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह नसावेत. साखर आणि बर्फ न घालता ज्यास प्या आणि प्यायला द्या.
४. पिलोचे कव्हर
आपल्या उशीला पिलो कव्गर घातलेले असते. हे कव्हर आपल्या केसांतील कोंडा, घाण यांमुळे खराब होते. तसेच त्यावर बसणारी धूळ लक्षात घेतो हे कव्हर आठवड्यातून एकदा धुवायवला हवे.
५. ऑर्गेनिक फेस वॉश आणि मॉइश्चरायजर ऐवजी फेस ऑईल
प्रत्यक्षात चेहऱ्याला पाण्याशिवाय कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नसते. पण लावतच असाल तर ऑर्गेनिक फेस वॉशचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण कोकोनट आणि ओटसचा फेसवॉश वापरतो असेही स्मृती सांगतात. बाजारात सध्या फळं, भाज्या यांचे बरेच चांगले फेसवॉश उपलब्ध असतात त्यांचा वापर करायला हवा. तसेच चेहरा मुलायम राहण्यासाठी मॉइश्चरायजरपेक्षा एखाद्या लाइट तेलाने चेहऱ्याला मसाज केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
६. आहार
आहारात रिफाईंड शुगर, रिफाईंड फ्लोअर म्हणजेच मैदा आणि रिफाईंड ऑईल यांचा वापर शक्यतो करु नये. एकूणच त्वचा चांगली ठेवायची असेल तर आहाराबाबत आपल्याला विशेष काळजी घ्यावीच लागते. तळलेले, मसालेदार, जंक फूड असे खाल्ल्याने त्वचा खराब होण्याची शक्यता जास्त असते.