आपण कायम तरुण आणि सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. चांगलं दिसायचं तर आपली त्वचा चांगली हवी. यासाठी आपण कधी घरी तर कधी पार्लरमध्ये जाऊन काही ना काही उपाय करतो. मात्र तरीही कमी वयात चेहरा सुरकुतणे, चेहऱ्याची त्वचा सैल पडणे, त्वचा रुक्ष होणे अशा समस्या निर्माण होतात. त्वचा एकदा सैल पडायला लागली की ती पुन्हा पुर्वपदावर येणे अवघड असते. कमी वयात ही समस्या निर्माण झाली की आपले वय आहे त्यापेक्षा जास्त असल्यासारखे वाटते, त्यामुळे विनाकारण आपण वयस्कर दिसतो. त्वचा नेहमी टाईट राहावी यासाठी पार्लरमध्ये काही ट्रीटमेंटस उपलब्ध असतात. मात्र या ट्रीटमेंटसाठी खूप पैसा खर्च होतो. इतकेच नाही तर यामुळे त्वचेचा पोतही खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी घरच्या घरी काही उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. त्वचा ओघळू नये म्हणून घरच्या घरी करता येणारा सोपा उपाय पाहूया (Easy Skin Tightening Home Remedy)...
१. यासाठी सगळ्यात आधी कोरफडीचा गर किंवा जेल घ्या. बाजारात मिळणाऱ्या विविध ब्रँडच्या जेल यासाठी आपण वापरु शकतो, तसेच घरी ताज्या कोरफडीपासून काढलेला गरही घेऊ शकतो. ही जेल चेहऱ्यावर एखाद्या पॅकप्रमाणे जाडसर असा थर लावावा.
२. साधारणपणे २ ते ३ मिनीटे ही जेल चेहऱ्यावर तशीच ठेवायची. त्यानंतर तुरटीचा छोटा तुकडा घेऊन तो चेहऱ्यावर गोलाकार फिरवावा. यामुळे कोरफडीचा गर पाण्याप्रमाणे वितळेल आणि हे पाणी चेहऱ्यावरुन खाली पडेल.
३. यानंतर चेहरा साबण किंवा फेसवॉश न लावता फक्त पाण्याने स्वच्छ धुवावा. मग हातावर थोडे मॉईश्चरायजर घेऊन ते हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होईल.
४. तुम्हाला एखादया कार्यक्रमाला बाहेर जायचे असल्यास हा उपाय करु शकता, त्यामुळे चेहऱ्याची त्वचा टाईट राहण्यास मदत होते. एरवीही त्वचा सैल पडू नये यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय आपण निश्चित करु शकतो.