Join us  

पार्लरमध्ये हजारो रुपये घालवण्यापेक्षा घरीच करा हेअर केराटीन ट्रिटमेंट, पाहा सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2024 9:41 AM

Easy steps of Hair Keratin Treatment at home : काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर केस अगदी सिल्की-मुलायम होण्यास मदत होते.

थंडी असो किंवा उन्हाळा अनेकदा आपले केस इतके रुक्ष आणि कोरडे होतात की ते मॅनेज करणे अवघड होऊन जाते. अशा केसांची कोणतीही हेअरस्टाईल केली तरी ती चांगली दिसत नाही. पण हेच केस जर छान मुलायम आणि सिल्की असतील तर ते सहज मॅनेज करता येतात. सध्या बऱ्याच तरुणी पार्लरमध्ये जाऊन स्ट्रेटनिंग,बायोटीन, केराटीन अशा विविध प्रकारच्या ट्रिटमेंट करतात ज्याने केस सिल्की होण्यास मदत होते. या ट्रिटमेंटसाठी एकतर बरेच तास जातात आणि केमिकल्सच्या वापराने केस कायमचे खराब होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर या ट्रिटमेंट खूप महाग असल्याने त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. पण घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन केराटीन ट्रिटमेंट करता येते. त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर केस अगदी सिल्की-मुलायम होण्यास मदत होते. पाहूयात ही ट्रीटमेंट घरच्या घरी कशी करायची (Easy steps of Hair Keratin Treatment at home) . 

१. एका वाटीत अर्धी वाटी तांदूळ आणि पाव वाटी मेथीचे दाणे घ्यावेत. यामध्ये पाणी घालून ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे. 

(Image : Google)

२. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करावी

३. मग हे मिश्रण गाळणीने किंवा सुती कपड्याने गाळून घ्यावे. 

४. यानंतर घरात नारळ असेल तर त्यापासून दूध काढायचे, घरात दूध करणे शक्य नसेल तर बाजारातून नारळाचे दूध विकत आणायचे. 

५. या दुधात मेथी आणि तांदळाची पेस्ट घालयची.

६. यामध्ये जवसाची पेस्ट किंवा कोरफडीचा गर घालायचा आणि हे मिश्रण चांगले एकजीव करायचे. 

७. ही पेस्ट सगळ्या केसांना व्यवस्थित लावून घ्यायची आणि २ तास तशीच ठेवायची. 

८. त्यानंतर केस शाम्पू आणि कंडीशनरने धुवायचे. केसांना छान चमक आलेली दिसेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी