मेकअप केल्यानंतर चेहेर्यावरचे अनेक दोष झाकले जातात असं आपल्याला वाटतं. पण हे अर्धसत्य आहे. चेहेर्यावरचे दोष मेकअपमुळे जास्त लक्षातही येतात. चेहेर्यावरचे अनावश्यक केस मेकअप चेहेर्यावर जास्त वेळ टिकण्यात अडचण निर्माण करतात. चेहेर्यावरचे केस पार्लरमधे वॅक्सिंगद्वारे काढण्याचा पर्याय आहे. पण तो वेदनादायक असून अनेकींच्या त्वचेला हे वॅक्सिंग सहन होत नाही. रॅशेस येतात. वेगवेगळ्या सौंदर्य कंपन्यांनी तयार केलेल्या वॅस्किंग स्ट्रिप मेडिकलमधे, कॉस्मेटिक्स दुकानांमधे उपलब्ध असल्या, त्याद्वरे वेदनारहित पध्दतीने केस काढण्याची सोय असली तरी याचीही अँलर्जी येते. म्हणून अनेकजणींसाठी हा पर्यायही सोयिस्कर ठरत नाही. तसेच संवेदनशील त्वचेसाठी तर हे फारच अवघड होतं. अशा वेळेस चेहेर्यावरच्या केसांचं काय करायचं हा प्रश्न पडतो.
चेहेर्यावरचे केस हे अवघड प्रकरण असलं तरी घरगुती उपायांनी ही समस्या सहज सुटू शकते. आणि या उपायाचे साइड इफेक्टसही होत नाही. त्यामुळे सौंदर्यतज्ज्ञही या नैसर्गिक आणि घरगुती उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला देतात.
Image: Google
घरच्याघरी वॅक्सिंगचे ३ पर्याय
1. बटाटा आणि मसुराच्या डाळीने चेहेर्यावरचे आणि हातापायावरचे केसही काढता येतात.यासाठी रात्री दोन चमचे मसुराची डाळ भिजत घालावी. सकाळी बटाट्याची सालं काढून बटाट्याचे तुकडे करुन भिजवलेल्या डाळीसोबत वाटावेत. या मिश्रणात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालावं. हे मिश्रण एकजीव करुन ते चेहेर्यावर लेपासारखं लावावं. लेप सुकला की हलक्या हातानं मसाज करत हा लेप काढून टकावा. चेहेरा गार पाण्यानं धुवून स्वच्छ करावा.
2. चंदन पावडर, संत्र्याच्या सालींची पावडर, हिरव्या मुगाचं पीठ, गुलाब पाणी आणि लिंबाचा रस घ्यावा. सर्वात आधी हे सर्व एक एक चमच घेऊन एकत्र करुन गुलाब पाण्यानं भिजवून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट चेहेर्यावर लावावी. लेप 15 मिनिटं सुकू द्यावा. लेप बोटं चेहेर्यावर गोल गोल फिरवत काढून टाकावा.
Image: Google
3. एक कप साखरेत दोन ते तीन लिंबाचा रस घालावा. हे सर्व चांगलं मिसळून घ्यावं. आणि भांडं गरम करायला ठेवावं. साखर जोपर्यंत गडद लाल रंगाची होत नाही तोपर्यंत ते गरम करावं. भांडं गॅसवरुन उतरवून त्यात ग्लिसरीन घालावं. हे मिश्रण एका डब्यात भरुन ठेवावं. हे मिश्रण ओठांच्या वरच्या भागावर, हुनवटीवर, गालावर केस असल्यास तिथे लावून् सुती कापडाच्या मदतीने ते ओढून काढावेत. या पध्दतीने केस काढल्यास त्रास होत नाही.