जसजसं वय वाढत जातं तसतसं चेहऱ्यात बदल होतात. त्वचेवर वयवाढीच्या खुणा दिसायला सुरूवात होते. चेहरा टॅन होतो. त्वचा कायम तरूण राहावी यासाठी अनेक एंटी एजिंग क्रिम्स उपलब्ध आहेत. घरगुती उपाय करून तुम्ही कमीत कमी वेळात इंस्टट ग्लो मिळवू शकता. हळदीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. (Anti -Aging Tips) हळदीत एंटी बॅक्टेरीअल, एंटी फंगल गुणधर्म आहेत. ज्यामुळे आरोग्यसह त्वचेलाही बरेच फायदे मिळता. अनेक सौदर्यं प्रसाधनांमध्ये हळदीचा वापर केला जातो. (Beauty anti aging tips easy ways to reduce premature aging skin)
त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या टाळण्यासाठी हा सोपा उपाय करताना सगळ्यात आधी ऑलिव्ह ऑईलमध्ये हळद आणि केसर मिसळा हे मिश्रण एकत्र करून ज्या ठिकाणी सुरकुत्या आहेत असं वाटतंय अशा ठिकाणी लावा. रात्रभर तसंच ठेवल्यानंतर सकाळी हात, पाय, चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवा.
चेहऱ्यावर वयवाढीच्या खुणा येऊ नयेत यासाठी एंटी एजिंग टिप्स
१) आहारात व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-सी असलेल्या पदार्थांचा समावेश करा. हे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. भरपूर ताजी फळे आणि भाज्या खा. ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.
२) सूर्यापासून त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरण्याची खात्री करा.
३) रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढा आणि मग झोपा. ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील आणि तुम्ही त्वचेशी संबंधित समस्या टाळू शकाल.
४) त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा नियमित वापर करा. ज्याच्या मदतीने तुम्ही कोरड्या त्वचेची समस्या टाळू शकता.
५) शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. अशा स्थितीत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्या. त्यामुळे त्वचेची चमक कायम राहील.
६) व्यायाम केल्याने ऊर्जा वाढते आणि ते त्वचेसाठीही फायदेशीर असते. हे त्वचेवर वृद्धत्वाचा प्रभाव प्रतिबंधित करते.