Lokmat Sakhi >Beauty > ऐन तारुण्यात केस पांढरे-टक्कल पडू लागले? रोज गुळासोबत खा मेथी दाणे, केस होतील घनदाट

ऐन तारुण्यात केस पांढरे-टक्कल पडू लागले? रोज गुळासोबत खा मेथी दाणे, केस होतील घनदाट

Eat jaggery and fenugreek seeds for White Hair problem : केस पांढरे झाले की डाय-मेहेंदी लावू नका, गुळ आणि मेथी दाणे खाऊनही केसांना पोषण मिळेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2024 11:10 AM2024-01-27T11:10:31+5:302024-01-27T11:15:02+5:30

Eat jaggery and fenugreek seeds for White Hair problem : केस पांढरे झाले की डाय-मेहेंदी लावू नका, गुळ आणि मेथी दाणे खाऊनही केसांना पोषण मिळेल..

Eat jaggery and fenugreek seeds for White Hair problem | ऐन तारुण्यात केस पांढरे-टक्कल पडू लागले? रोज गुळासोबत खा मेथी दाणे, केस होतील घनदाट

ऐन तारुण्यात केस पांढरे-टक्कल पडू लागले? रोज गुळासोबत खा मेथी दाणे, केस होतील घनदाट

आजकाल कमी वयातच लोकांचे केस पांढरे (Grey Hair) होऊ लागले आहेत. पण पांढऱ्या केसांमुळे सौंदर्यात बाधा तर येतेच, शिवाय केसांच्या अनेक समस्याही निर्माण होतात. केसात कोंडा, केस गळती यासह पांढऱ्या केसांमुळे बरेच जण त्रस्त आहेत. पांढरे केस लपवण्यासाठी आपण हेअर डाय, मेहेंदी किंवा विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. पण केमिकल उत्पादनांमुळे केस काळे होण्याऐवजी खराब होतात (Hair Care Tips). केसांचा पोत पूर्ण बिघडतो. केस पांढऱ्या होण्यामागे अनेक कारणे आहेत.

बऱ्याचदा आपण घेत असलेला आहार हा केसांना पुरेसे पोषण देत नाही. त्यामुळे केस पांढरे होतात. अशावेळी आपण गुळ आणि मेथी दाणे खाऊन केसांना काळे करू शकता. केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी गुळ आणि मेथी दाण्याचे सेवन कसे करावे? पाहा(Eat jaggery and fenugreek seeds for White Hair problem).

केस काळे करण्यासाठी अशा पद्धतीने खा गुळ आणि मेथी दाणे

सकाळी उठल्याबरोबर गूळ आणि मेथी दाण्याची पावडर एकत्र करून खाल्ल्याने, केस पांढरे होण्याची समस्या दूर होऊ शकते. गुळ आणि मेथी दाण्यातील गुणधर्म केसांना पोषण देण्यास मदत करतात.

केस गळून विरळ झालेत? खोबरेल तेलात मिसळा कांदा-कडीपत्ता; हेअर ग्रोथचं सिक्रेट

केसांसाठी गुळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट यासह इतर पौष्टीक घटक आढळतात. हे पोषक घटक त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त ठरतात. गुळामुळे केस मऊ, मजबूत आणि चमकदार होण्यास मदत मिळते. यासह गुळात भरपूर प्रमाणात लोह असल्याने ते केस गळणे देखील टाळते. जर ऐन तारुण्यात केस पांढरे होत असतील तर, नियमित सकाळी गुळ खा. गुळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

केस घनदाट-त्वचा उजळ हवी? मग खोबरेल तेलात मिसळून लावा २ जादुई गोष्टी, रुप उजळेल

मेथी दाणे

हल्ली केसगळती अथवा टक्कल पडण्याच्या समस्येपासून तरुण वर्गासह इतर लोकंही त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून आपण मेथी दाणे खाऊ शकता. मेथीमध्ये असणारे प्रोटीन, विटामिन सी हे स्काल्प हेल्दी ठेऊन केसांना पोषण देतात. ज्यामुळे पांढरे केस काळे होतात. मेथी दाण्यांमध्ये लोह देखील असते, जे स्काल्पवरील ब्लड सर्क्युलेशन सुधारून केसांच्या वाढीसाठी मदत करते.  

 

Web Title: Eat jaggery and fenugreek seeds for White Hair problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.