Lokmat Sakhi >Beauty > तेल लावा, शाम्पू वापरा, केस गळणं थांबतच नाही? मग या 4 गोष्टी खा, केस गळणं थांबेल

तेल लावा, शाम्पू वापरा, केस गळणं थांबतच नाही? मग या 4 गोष्टी खा, केस गळणं थांबेल

तज्ज्ञ सांगतात की, केसांवरच्या समस्यांचं उत्तर हे केवळ तेल शाम्पूमधे शोधून चालत नाही. याचं मूळ आपल्या चुकीच्या आहारपध्दतीत असल्यानं पोषक आहार घेण्याची सवय लावली तरी केसांच्या समस्या दूर होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:51 PM2021-08-17T16:51:38+5:302021-08-17T17:06:12+5:30

तज्ज्ञ सांगतात की, केसांवरच्या समस्यांचं उत्तर हे केवळ तेल शाम्पूमधे शोधून चालत नाही. याचं मूळ आपल्या चुकीच्या आहारपध्दतीत असल्यानं पोषक आहार घेण्याची सवय लावली तरी केसांच्या समस्या दूर होतात.

Eat these 4 things to stop hair fall | तेल लावा, शाम्पू वापरा, केस गळणं थांबतच नाही? मग या 4 गोष्टी खा, केस गळणं थांबेल

तेल लावा, शाम्पू वापरा, केस गळणं थांबतच नाही? मग या 4 गोष्टी खा, केस गळणं थांबेल

Highlights केसांचं आरोग्य आणि सौंदर्य जपायचं असेल तर समतोलित आहार अर्थात बॅलन्स डाएट असणं अत्यंत आवश्यक आहे.कढीपत्त्याच्या समावेश आहारात नियमित स्तरावर केल्यास जेस दाट होण्यास मदत होते.डाळी आणि शेंगवर्गीय भाज्यांमुळे केस कोषिका मजबूत होतात तसेच केसांचं पोषणही होतं.

केस गळणे, पातळ होणे, पांढरे होणे, कोंडा होणे, केस कोरडे होणे अशा केसासंबंधी अनेक समस्या असतात. या प्रत्येक समस्येचं उत्तर आपण तेल, शाम्पू, कंडिशनर किंवा हेअर सिरममधे शोधलं जातं. पण केसांची समस्या ही केवळ सौंदर्यविषयक समस्या नसून ती जीवनशैलीशी निगडित समस्या आहे. बाहेरचं प्रदूषण, अयोग्य पध्दतीचा आहार, तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि कमी झोप या सर्व कारणांनी केस गळतात, पातळ होतात लवकर पांढरे होतात. तज्ज्ञ सांगतात की, केसांवरच्या समस्यांचं उत्तर हे केवळ तेल शाम्पूमधे शोधून चालत नाही. याचं मूळ आपल्या चुकीच्या आहारपध्दतीत असल्यानं पोषक आहार घेण्याची सवय लावली तरी केसांच्या समस्या दूर होतात. आहारात प्रथिनं, लोह आणि ब जीवनसत्त्वाची कमतरता असली की केस गळणं सुरु होतं. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारातून 0.8 ग्राम प्रथिनं शरीरात जाणं आवश्यक आहे.

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर नितिका कोहली सांगतात की, केसांचं आरोग्य आणि सौंदर्य जपायचं असेल तर समतोलित आहार अर्थात बॅलन्स डाएट असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या रोजच्या आहारात प्रामुख्याने वनस्पतीजन्य घटक असायला हवेत. हे घटक आपले केस, त्वचा निरोगी ठेवतात. आपली हातापायाची नखं चांगली राहातात. डॉ. निकिता यांच्या मते आहारात काही विशिष्ट घटक नियमित असले तर त्याचा परिणाम केसांच्या समस्या दूर होण्यास होतो.

केसांसाठी  पोषक 

छायाचित्र- गुगल

1. आवळ्याचा ज्यूस:- आवळ्याच्या ज्यूसमधे क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. आवळ्याच्या रसामुळे कोलॅजनची निर्मिती होते. हे कोलॅजन केस कोषिकांना मजबूत करतात. केस वाढण्यास मदत करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस पिल्यास त्याचा केसांना फायदा होतो.

छायाचित्र- गुगल

2.कढीपत्ता:- कढीपत्त्यात अँण्टिऑक्सिडण्टस असतात सोबतच अनेक पोषक घटक असतात. कढीपत्त्यातील गुणधर्म रक्तातील अशुध्द घटक काढून टाकतात. तसेच टाळूतील ऑक्सिजनची पातळी वाढवतात. नवीन केस कोषिका निर्माण करण्यास कढीपत्ता मदत करतो. कढीपत्त्याच्या समावेश आहारात नियमित स्तरावर केल्यास जेस दाट होण्यास मदत होते.

छायाचित्र- गुगल

3. राताळी:- राताळीत बीटा केरोटीन आणि अ जीवनसत्त्व असतं. केस गळल्यानंतर नव्यानं केस येण्यासाठी हे घटक एका टॉनिक सारखे काम करतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा बाजारात राताळी असतील तेव्हा ती आपल्या आहारात असण्याची काळजी घ्यायला हवी.

छायाचित्र- गुगल

4.डाळी आणि शेंगवर्गीय भाज्या:- फॉलिक अँसिड, प्रथिनं आणि झिंक हे घटक केस कोषिकांची देखभाल करतात आणि त्यांना दुरुस्तही करतात. हे घटक सर्व प्रकारच्या डाळींमधे आणि शेंगवर्गीय भाज्यांमधे असतात. डाळी आणि शेंगवर्गीय भाज्यांमुळे केस कोषिका मजबूत होतात तसेच केसांचं पोषणही होतं.

Web Title: Eat these 4 things to stop hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.