Lokmat Sakhi >Beauty > केस लांब हवे, पण केसगळती थांबतच नाही? आजीनं सांगितलेला 'हा' पदार्थ खा, दाट-सुंदर होतील केस

केस लांब हवे, पण केसगळती थांबतच नाही? आजीनं सांगितलेला 'हा' पदार्थ खा, दाट-सुंदर होतील केस

Eat These 4 Types Of Seeds For Long Hairs : केस वाढवण्यासाठी नेहमी नेहमी शॅम्पू, कंडिशनरचा वापर करण्याची आवश्यकता नाही. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही लांबसडक केस मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 02:14 PM2024-08-14T14:14:34+5:302024-08-14T14:46:14+5:30

Eat These 4 Types Of Seeds For Long Hairs : केस वाढवण्यासाठी नेहमी नेहमी शॅम्पू, कंडिशनरचा वापर करण्याची आवश्यकता नाही. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही लांबसडक केस मिळवू शकता.

Eat These 4 Types Of Seeds For Long Hairs : Hair Care tips How To Grow Hairs Naturally | केस लांब हवे, पण केसगळती थांबतच नाही? आजीनं सांगितलेला 'हा' पदार्थ खा, दाट-सुंदर होतील केस

केस लांब हवे, पण केसगळती थांबतच नाही? आजीनं सांगितलेला 'हा' पदार्थ खा, दाट-सुंदर होतील केस

केस वाढवण्यासाठी, दाट होण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या शॅम्पू किंवा कंडिशनरचा वापर करत असतो. केस वाढवणं काही सोपं काम नाही.(Hair Fall Solution) केस एकदा गळायला लागले की दिवसरात्र गळून गळून डोकं पातळ दिसू लागतं. केस वाढवण्यासाठी नेहमी नेहमी शॅम्पू, कंडिशनरचा वापर करण्याची आवश्यकता नाही. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही लांबसडक केस मिळवू शकता. (Hair Care tips How To Grow Hairs Naturally)

सगळ्यात आधी एका पॅनमध्ये  अळशीच्या बीया, भोपळ्याच्या बीया, चिया सिड्स, सुर्यफुलाच्या बिया आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित भाजून घ्या. गरम केल्यानंतर या बियांचे मिश्रण एका बरणीत भरून ठेवू शकता.   रोज १ ते २ चमचे हे मिश्रण घेतल्यानं केसांचे आरोग्य चांगले राहील आणि केसांची  वाढही चांगली होईल. केसांच्या गंभीर समस्याही उद्भवणार नाहीत.

१) अळशीच्या बीया (Flex Seeds)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार अळशीच्या बियांमध्ये ओमेगी-३ फॅटी एसिड्स, लिगनन्स, व्हिटामीन बी, व्हिटामीन ई फायबर्स असतात. ओमेगा-३ मुळे  स्काल्प हेल्दी चांगला राहण्यास मदत होते. याशिवाय इन्फ्लामेशन, टळण्यास मदत होते. फ्लेक्स सिड्सच्या तेलाची कॅप्सूल किंवा आळशीच्या बीयांचा आहारात समावेश करू शकता.  आळशीच्या बीयांचे तेल केसांना लावल्यानं केसांची वाढ चांगली होते.


२) चिया सिड्स (Chia Seeds)

चिया सिड्समध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड्स प्रोटीन्स आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात.  ज्यामुळे केस स्ट्रेट राहण्यास मदत होते आणि केसांना  प्रोटीनसारखे इतर न्युट्रिएंट्स मिळतात. तुम्ही ओट्समध्ये किंवा पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता. 

जया किशोरींनी सांगितलं सुंदर त्वचेचं सिक्रेट; चेहऱ्याला लावतात किचनमधले हे ३ पदार्थ-चेहऱ्यावर येईल तेज

३) भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds)

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम, आयर्न आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात. झिंकमुळे हेअर ग्रोथ चांगली होते. डॅमेज केस रिपेअर होण्यास मदत होते. भोपळ्याच्या सुकवलेल्या बीया रोज खाल्ल्याने शरीरात रक्ताची  कमतरताही भासत नाही.

४) सुर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds)

सुर्यफुलांच्या  बियांमध्ये व्हिटामीन ई, सेलेनियम, झिंक असते. व्हिटामीन ई मुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि केसांची चांगली वाढ होते आणि केस गळणं थांबतं. अनेक हेअर केअर  उत्पादनांमध्ये  सुर्यफुलांच्या बियांचा वापर केला जातो. 

Web Title: Eat These 4 Types Of Seeds For Long Hairs : Hair Care tips How To Grow Hairs Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.