Lokmat Sakhi >Beauty > केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? नियमित खा ४ फळं, केस होतील लांब - होईल योग्य वाढ

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? नियमित खा ४ फळं, केस होतील लांब - होईल योग्य वाढ

Eat these fruits to prevent baldness! आता केसांची गळती विसरा, महागडे प्रॉडक्ट्सपेक्षा रोज खा ४ फळं, केसांची होईल नव्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 02:44 PM2023-06-05T14:44:35+5:302023-06-05T14:57:09+5:30

Eat these fruits to prevent baldness! आता केसांची गळती विसरा, महागडे प्रॉडक्ट्सपेक्षा रोज खा ४ फळं, केसांची होईल नव्याने वाढ

Eat these fruits to prevent baldness! | केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? नियमित खा ४ फळं, केस होतील लांब - होईल योग्य वाढ

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? नियमित खा ४ फळं, केस होतील लांब - होईल योग्य वाढ

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याच्या निगडीत समस्या निर्माण होत आहे. मुख्य म्हणजे केस गळतीची समस्या ही प्रत्येकाल छळत आहे. केस गळती अनेक कारणांमुळे होऊ शकते. केमिकल प्रॉडक्ट्स असो किंवा आहारात पौष्टीक घटकांची कमतरता, यामुळे केस गळतीची समस्या निर्माण होते. काहींचे केस खूप गळता.

परंतु, केस गळती झाल्यानंतर पुन्हा नव्याने केसांची वाढ होत नाही. केसांना फक्त प्रॉडक्ट्स लावण्यापेक्षा शरीरात कोणत्या पौष्टीक घटकांची कमतरता आहे का? हे जाणून घेणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत आयर्न, झिंक, व्हिटॅमिन ई व अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी मदत होईल(Eat these fruits to prevent baldness!).

केसांच्या वाढीसाठी कोणते फळ खावे

एवोकॅडो

केसांसाठी एवोकॅडो खाण्याचे अनेक फायदे आहेत. एवोकॅडो व्हिटॅमिन ईने समृद्ध आहे. जे केसांमध्ये कोलेजन वाढवण्यास, व केस पांढरे होण्यापासून रोखते. यासह केसांमधील ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या चालण्यास मदत करते. ज्यामुळे केसांची वाढ होते.

५ रुपयांची तुरटी केस आणि स्किनसाठी ठरते रामबाण उपाय, पाहा भन्नाट वापर व फायदे

किवी

किवीचे सेवन केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. किवीमध्ये काही अँटिऑक्सिडंट आढळतात, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. याशिवाय किवीमध्ये व्हिटॅमिन सी, के, ई आणि पोटॅशियम असते, जे केसांच्या वाढीसोबत मदत करते.

केळी

केळी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. केळीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे स्प्लिट एंड्सची समस्या कमी होते. याशिवाय त्यातील जीवनसत्त्वे टाळूच्या छिद्रांमध्ये रक्त परिसंचरण सुधारतात. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

महिन्यातून कितीवेळा केसांना मेहंदी लावावी? पाहा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत

पपई

पपईचे सेवन केल्याने केसांच्या अनेक समस्या कमी होतात. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते, ज्यामुळे केसांची वाढ होते. या व्यतिरिक्त, पपई अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. जे स्काल्प इन्फेक्शन कमी करतात. व केसांच्या वाढीसाठी मदत करतात. त्यामुळे पपईचे सेवन करा.

Web Title: Eat these fruits to prevent baldness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.