बदाम हे एक असं ड्रायफ्रुट आहे ज्यात अनेक पोषक तत्वे आढळून येतात. बदाम खाणे केस, त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यातील प्रोटीन, फायबर यासह विविध पोष्टिक घटक शरीरातील कोलेस्टेरोलची पातळी कमी करण्यास मदत करतात. काही लोकं बदाम कच्चे खातात. तर, काही लोकं भिजवून खातात. जेव्हा आपण बदाम भिजवून खातो तेव्हा त्याची साल फेकून देतो. मात्र, ही साल फेकून देऊ नका. या सालीमध्ये विशिष्ट पौष्टीक घटक असतात. बदामाच्या सालींचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेच्या निगा राखण्यासाठी वापरले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, बदामाच्या सालींचे वापर करून आपण चेहऱ्याला तजेलदार बनवू शकता.
बदामाच्या सालींपासून तयार करा स्क्रब
स्क्रबिंगसाठी लागणारं साहित्य
बदामाचे सालं
ओट्स
बेसन
कॉफी
दही
सर्वप्रथम बदामाचे साल उन्हात सुखवून घ्या. सालं सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करा. पावडर तयार झाल्यानंतर त्यात ओट्स, बेसन आणि कॉफी टाका. आता सगळं मिश्रण चांगले मिक्स करा. अशा प्रकारे आपली स्क्रबिंग पावडर रेडी झाली आहे. आपण ही पावडर एका टाईट डब्ब्यात साठवून ठेऊ शकता.
लावण्याची पद्धत
एका बाउलमध्ये स्क्रबिंग पावडर घ्या त्यात दही मिसळा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर हातावर घ्या. दोन ते तीन थेंब पाणी टाका आणि हे मिश्रण चांगले चेहऱ्यावर पसरवा. हलक्या हातांनी मसाज करा. पंधरा मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. असे केल्याने चेहरा तजेलदार आणि कोमल दिसेल.