Join us  

कांद्याचे साल फेकून देता? केसांना ‘असे’ लावा कांद्याचे साल-डाय न करता काळे होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 9:38 AM

Effective Home Remedies For Grey Hair : स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही केस काळे करू शकता.

केस पांढरे झाल्यानंतर हेअर डाय किंवा ग्लोबल कलर करण्याची इच्छा होते. हेअर कलर करताना बरेच केमिकल्स केसांच्या संपर्कात येतात. (How to make hair dye at home for get black hairs) त्यामुळे केस जास्त प्रमाणात गळू शकतात किंवा तात्पुरता काळा रंग दिसून पुन्हा केस पांढरे होऊ शकतात. (Hair Care Tips)

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता. या उपायांसाठी तुम्हाला कोणचाही जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही केस काळे करू शकता. (Effective Home Remedies For Grey Hair)

घरगुती हेअर डाय कसा बनवावा?  

केसांसाठी घरगुती हेअर डाय बनवण्यासाठी सगळ्यात आधी कांद्याचे साल, कढीपत्त्याची पानं, कलौंजी (काळ्या बीया),  लवंग, राईचं तेल किंवा नारळाचं तेल हे साहित्य लागेल.  हेअर डाय बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत कांद्याचे साल गरम करून घ्या. त्यात कढीपत्ता आणि लवंग घाला. हे साहित्य मंद आचेवर गरम करत असताना सतत चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहा आणि मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या. 

गौरी-गणपतीत चेहऱ्यावर तेज हवंय? पार्लरला न जाता घरी करा ४ उपाय, नितळ त्वचा-ग्लोईंग चेहरा

बारीक केलेलं मिश्रण एका वाटीत काढून त्यात तेल घाला. तेलात हे मिश्रण व्यवस्थित मिसळल्यानंतर केसांच्या मुळांना लावा. त्यानंतर केसांच्या लांबीलासुद्धा लावा. हे तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर केस व्यवस्थित बांधून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. या मिश्रणाच्या वापराने केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. 

केसांवर कांद्याचा वापर कसा करावा?

कांद्या रस केसांच्या वाढीसाठी आणि केस काळे करण्यासाठी फायदेशीर ठरतो. कांद्याचे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ ते ३ कांदे घ्या आणि ते बारीक तुकड्यांमध्ये चिरा, त्यानंतर एका मोठ्या वाटीत नारळाचं तेल भरा. तेल मध्यम आचेवर गरम होऊ द्या त्यात कांद्याचे तुकडे घाला.

केस झाडूसारखे दिसतात, पातळ झाले? चमचाभर तेलाची जादू; लांब, दाट-मऊ होतील केस

कांदे तळून झाल्यानंतर गॅस बंद करा. कांदे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर गॅस बंद करा मग तेल गाळून घ्या. तेल थंड झाल्यावर एका बरणीत भरा. केसांवर या तेलाचा वापर केल्यास केसांची वाढ चांगली होईल आणि केस दाट दिसतील. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स